Sat, Oct 31, 2020 15:41होमपेज › Satara › 'पृथ्वीराज चव्हाणांच्या ताफ्यातील लोकही माझ्या संपर्कात आहेत'

'पृथ्वीराज चव्हाणांच्या ताफ्यातील लोकही माझ्या संपर्कात आहेत'

Published On: Sep 11 2019 3:39PM | Last Updated: Sep 11 2019 3:27PM

डॉक्टर अतुल भोसलेकराड : प्रतिनिधी

राज्यातच काय पण कराडात काँग्रेसमध्ये काय सुरू आहे? हे सर्वांना माहिती आहे. ज्यांनी 40 वर्ष तुमची सेवा केली. तुमची राजकीय परिस्थिती नसताना स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन तुमचे काम केले. दिवसरात्र तुम्ही देव असल्याचे लोकांना सांगत होते, त्यांनाही तुम्हाला सांभाळता आले नाही. तसेच तुमच्या ताफ्यात असणारे लोकही आपल्या संपर्कात आहेत. अश्या लोकांना तुम्हाला संभाळता आले नाही, कार्यकर्ता खूप लांबची गोष्ट अशा शब्दात विठ्ठल रखुमाई देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि डॉक्टर अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

वेणूताई चव्हाण स्मारक येथे विकासाचे अतुलपर्व या पुरस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना विठ्ठल- रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष भोसले यांनी ही टीका केली. यावेळी ना. शेखर चरेगावकर, कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, विद्या पावसकर, अशोकराव थोरात, रामकृष्ण वेताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चव्हाण याच्या ताफ्यातील कार्यकते माझ्याकडे येतात. त्यावेळी मी त्यांना एक सल्ला देतो आपण आलात तर लोक काय म्हणतील ? काहींना आपण दिल्या घरी सुखी रहा असे सांगतो. आमच्याकडे सत्ता नसली, तरी आम्ही कधीही कार्यकर्ता उघडा पडू दिला नाही, हे लक्षात ठेवा असेही ना. डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.