Fri, Jul 10, 2020 15:56होमपेज › Satara › मराठा क्रांती मोर्चा उदयनराजेंच्या पाठीशी 

मराठा क्रांती मोर्चा उदयनराजेंच्या पाठीशी 

Published On: Apr 12 2019 2:11AM | Last Updated: Apr 12 2019 12:03AM
सातारा : प्रतिनिधी

छत्रपतींचा वारसा लाभलेले  उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मागे  ठामपणे उभे राहण्याचा ठराव  मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा जिल्हा समन्वयकांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनीही खा. उदयनराजेंच्या विजयाच्या हॅटट्रीकसाठी जीवाची बाजी लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

खा. उदयनराजे भोसले यांच्या  उपस्थितीत हॉटेल लेक व्ह्यू येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली.  त्यामध्ये सुनील शितोळे यांनी उदयनराजेंना पाठिंबा देण्याचा ठराव मांडला. शरद जाधव यांनी त्याला अनुमोदन दिले. यावेळी आ. शशिकांत शिंदे, जि.प.चे माजी सभापती सुनील काटकर प्रमुख उपस्थित होते. 
यावेळी बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, पाच वर्षांपासून देशविघातक प्रवृत्ती सत्तेत आहे. त्यांच्या कपड्यांवर, चा

ण्या-बोलण्यावर जावू नका. लोकांचा विश्‍वासघात करण्याचे पाप या सरकारने सत्तेवर राहून केले. काही निर्णय समन्वयातून घ्यावे लागतील. ते होण्यासाठी तुमच्या विचारांचे लोक सत्तेत गेले पाहिजेत. 

पाटण तालुक्यातील (कै.) रोहन तोडकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस श्री. छ. उदयनराजे भोसले यांना पहिल्या दोन वेळेपेक्षा अधिक मताधिक्य देऊन यावेळी लोकसभेची हॅटट्रिक होण्यासाठी  जीवाची बाजी लावण्याचा निर्धार  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला.

खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ झालेल्या बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, युवराज पवार,  विकास पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र केंजळे, अश्विन गोळे, दादा शिंगण, सातारा शहराध्यक्ष राहूल पवार आदी उपस्थित होते.

पेट्रोल, घरगुती गॅस सिलेंडरचे भाव 5 वर्षांत दुपटीने वाढले. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हे रोखायचे असेल तर सत्ताधार्‍यांना राज्यात रोखा, असे आवाहन रवी शेलार यांनी केले.
यावेळी विकास पवार यांनीही मत मांडले. बैठकीस राजेंद्र बावळेकर, गोरख नारकर, अविनाश गोगावले, सागर बर्गे, निलेश जाधव, अमोल कांबळे, दत्ता करंजेकर, नितीन पार्टे,  विशाल गोळे, सागर बर्गे, शुभम विधाते, संजय गायकवाड, विजय पंडीत, विश्वास सोनावणे आदी उपस्थित होते.

लोकशाहीतील राजे असलेली जनताच सरकारला धडा शिकवेल : खा. उदयनराजे 
 सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. खोटं बोल पण रेटून बोल हे सरकारचं धोरण जास्त दिवस चालणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत  देशात परिवर्तन अटळ आहे. लोकशाहीतील राजे असलेली जनताच सरकारला धडा शिकवेल, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.