Sat, Aug 08, 2020 02:32होमपेज › Satara › कराड : 'त्यांना' भावी मुख्यमंत्री म्हटल्याने हसू येते : अतुल भोसले (video)

कराड : 'त्यांना' भावी मुख्यमंत्री म्हटल्याने हसू येते : अतुल भोसले (video)

Published On: Oct 01 2019 12:17PM | Last Updated: Oct 01 2019 12:55PM

डॉ. अतुल भोसलेकराड : प्रतिनिधी

माणसाने स्वप्न बघावे. मात्र किमान ते दिवसा पाहू नये. स्वप्न रात्री बघतात, मात्र परवा एक मेळावा झाला. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना भावी मुख्यमंत्री म्हटले गेले आणि याचे आपणास हसू येते, असा उपरोधिक टोला डॉ. अतुल भोसले यांनी लगावला आहे. सध्यस्थितीत काँग्रेस औषधालाही शिल्लक राहणार की नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात शिवशाहीचे सरकार येणार असल्याचा विश्वासही डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.

कराड शहरातील सर्व व्यापारी असोसिएशनच्या स्नेहमेळाव्यात बोलताना ना. डॉ. अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. यावेळी शेखर चरेगावकर, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जयवंतराव पाटील, महादेव पवार यांच्यासह व्यापारी संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आदी उपस्थित होते.

डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, लोकसभेच्या ४८ जागांपैकी १ जागा काँग्रेसची आहे. तेही उमेदवार शिवसेनेतून आयात केले होते आणि म्हणूनच ते विजयी झाले आहेत. नाहीतर काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नसता.