Fri, Jul 10, 2020 02:43होमपेज › Satara › सावधान! तुमच्या घरात पाल चहा पिते (video)

सावधान! तुमच्या घरात पाल चहा पिते (video)

Published On: Jan 23 2018 8:25PM | Last Updated: Jan 23 2018 8:26PMसातारा : पुढारी ऑनलाईन 

सकाळी सकाळी महिलांची ब्रेकफास्टची घाई असते. त्यात पती महाशयांना सुरुवातीला चहा लागतो. अंघोळ झाल्यावर त्यांची आरोळी पडते. अगं चहा झाला का! स्वयंपाक घरातून आवाज फ्रीजवर ठेवलाय. पण जेव्हा फ्रीजवर पती महाशय चहा घेण्यासाठी जातात. तेव्हा तेथील दृश्य बघून ते हादरुनच जातात. कारण पत्नीने ठेवलेला चहा चक्क पाल पीत असल्याचे दृश्य त्यांना दिसते. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट व स्वयंपाकाच्या तयारीसाठीची महिलांची धांदल आपण दररोज बघतच असतो. पण महिलांच्या होणार्‍या धावपळीबाबत कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील समजून घेण्याची गरज आहे. घरात उघडे पदार्थ रहाणार नाहीत याची खबरदारी सर्वांनीच घ्यायला हवी. कारण सध्या सोशल मिडीयावर पाल चक्क चहा पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

धावपळीच्या या जगतात नकळतपणे घडणारे काही प्रकार नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात. पाल ही ‘फायलम कारडाटा’ या समूहात येते. या समूहातील प्राण्यामध्ये युरिक अॅसिड नावाचे विष असते. त्यामुळे कुटुंबातील सर्वांनीच घरातील प्रत्येक पदार्थ झाकूण ठेवून दक्षता घ्यावी.