Mon, Aug 10, 2020 05:27होमपेज › Satara › रेठरेत ग्रामसभेनंतर मारामारी

रेठरेत ग्रामसभेनंतर मारामारी

Published On: Dec 13 2017 2:04AM | Last Updated: Dec 12 2017 11:04PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

ग्रामसभा संपल्यानंतर पाणीपुरवठा समिती निवडीच्या कारणावरून मारामारी झाली. यावेळी दोघांनी एकमेकांचा चावा घेतल्याने ते जखमी झाले. रेठरे खुर्द (ता. कराड) येथे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर घेतलेल्या पहिल्याच ग्रामसभेनंतर ही घटना घडली. याप्ररकणी कराड तालुका पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत ग्रामपंचायत सदस्या सुनीता कुंडलिक नलवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आबा ऊर्फ सुरेश शिवाजी गोरे, दत्तात्रय यशवंत गावडे, अधिकराव बाळकृष्ण पाटील व जयकर दिनकर गोरे (सर्व रा. रेठरे खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसभा संपल्यानंतर ग्रामसभेस उपस्थित नसणार्‍या ग्रामस्थांची नावे  पाणीपुरवठा समितीमध्ये घालण्यास आम्ही विरोध केला. त्यामुळे वरील चौघा संशयितांनी मला व आमच्या पक्षातील सदस्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. तर आबा गोरे याने नितीन प्रकाश जाधव यांच्या डाव्या दंडास जोराचा चावा घेतल्यामुळे त्यांच्या दंडास जखम झाली आहे.   तर, सुरेश शिवाजी गोरे (रा. रेठरे खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन प्रकाश जाधव, विशाल शंकर जाधव, प्रताप तानाजी जाधव, जयवंत प्रकाश जाधव (सर्व रा. रेठरे खुर्द) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ग्रामसभा संपल्यानंतर मी संतोष बबनराव जाधव यांनाही पाणीपुरवठा समितीमध्ये घेण्याची विनंती केली. पंरतु, त्यावेळी वरील संशयितांनी निवडीस विरोध करत मारहाण केली,  असे फिर्यादीत म्हटले आहे.