Sat, Jul 11, 2020 20:31होमपेज › Satara › सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपात : शिवेंद्रराजे(Video)

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपात : शिवेंद्रराजे(Video)

Published On: Jul 30 2019 8:45PM | Last Updated: Jul 30 2019 10:39PM

आमदार शिवेंद्रराजे भोसलेसातारा : प्रतिनिधी

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मंगळवारी मुंबईत आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सायंकाळी लगेच साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका मांडली. मुंबईमध्ये बुधवारी मुखमंत्री यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, आपल्या कार्यकर्त्यांनी तूर्तास राजीनामा देऊ नये, असेही त्यांनी सांगितले आहे.

आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारा - जावळी मतदार संघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मेडिकल कॉलेज, आणखी एक एमआयडीसी, उरमोडी प्रकल्प असे प्रश्न असून हे सोडवणुकीसाठी सत्ता महत्वाची आहे. सध्या आघाडीचे सरकार येईल असे व्यक्तिशः आपणाला वाटत नाही. राष्ट्रवादी पक्षातील व जिल्ह्यातील कोणावरही आपला आक्षेप नाही. केवळ मतदार संघाचा विकास हा मुद्दा घेऊन आपण भाजपमध्ये जात आहे, असल्याचेही आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

साताऱ्यात केले जंगी स्वागत... 

आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते साताऱ्यात येताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत केले. सुरुची या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी दुपारपासून गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच राजे.. बाबाराजे अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला.