उंडाळे : वैभव पाटील
शेतकरी ग्राहक आणि सर्वसामान्य जनतेची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कराड तालुक्यातील विविध शाखामध्ये कर्मचारी संख्या कमी नव्हे तर अत्यल्प असल्याने बँक ग्राहकांना तास न् तास ताटकळत बसावे लागत असून साध्या - साध्या कामासाठी ग्राहकांना दिवसभर ताटकळत बसावे लागते आहे
ग्रामीण भागातील लोकांची अर्थ वाहिनी म्हणून या बँकेकडे पाहिले जाते राष्ट्रीयकृत बँका या मोठी गावे,शहरे येथे कार्यरत आहेत पण जिल्हा बँका मात्र छोट्या गावात काम करत आहेत त्यामुळे नेहमीच या बँका मध्ये खातेदार ग्राहकांची गर्दी असते. शेतकर्यांना पिक कर्ज, शेतीसाठीची अन्य कर्ज, सोने तारण कर्ज विविध कर्जे, शासकीय कर्मचारी पगार, वीज बील स्विकृती यासह विविध कामे येथून केले जातात. तालुक्यात जिल्हा बँकेच्या जवळजवळ 54 ते 56 शाखा आहेत. या सर्व शाखामध्ये अपवाद वगळता सर्वत्र अपुरा कर्मचारी वर्ग आहे. काही शाखा तर एकाच कर्मचार्यांवर चालवल्या जातात. कराड दक्षिण विभागात तर अनेक शाखा एकाच कर्मचार्यांवर सुरू आहेत यामध्ये येवती, सवादे यासह शाखाचा समावेश आहे, तर इतर शाखाचा विचार करता जेथे चार कर्मचारी हवेत तेथे दोन कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचार्यांवर कामाचा मोठा ताण पडतो.
सलग नाबार्ड पुरस्कार प्राप्त बँक म्हणून ज्या बँकेचे नाव घेतले जाते.या बँकेत एखाद्या शाखेच्या कर्मचारी रजेवर जायचा म्हटले तरी तेथे दुसर्या ठिकाणहून कर्मचारी आल्यानंतर सदर शाखेवरील कर्मचार्याला रजा मिळते. त्यामुळे तात्काळ रजा हवी किंवा महत्त्वाचे काम आजारपण यासाठी रजा मिळवणेसाठी मोठी खटपट करावी लागते उंडाळे विभागात उंडाळे वगळता येवती, येळगाव, म्हासोली,सवादे, ओंड येथे जिल्हा बँकेच्या शाखा असल्यातरी येथेही ऑनलाईन सिस्टीम मध्ये घोटाळा झाला की दिवभर कामकाज बंद राहते परिणामी कर्मचारी वैतागून जातो त्याचा लोड पुढे कामावर होतो व पुढे जुने व नवे कामाचा लोड येतो.
Tags : Satara, inadequate, employees, district bank