Wed, Aug 12, 2020 12:09होमपेज › Satara › कराड : विद्यार्थिनी स्वच्छतागृहात बनवली व्हिडिओ क्लिप(व्हिडिओ)

कराड : विद्यार्थिनी स्वच्छतागृहात बनवली व्हिडिओ क्लिप(व्हिडिओ)

Published On: Dec 13 2017 5:34PM | Last Updated: Dec 13 2017 9:42PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

विद्यार्थिनी स्वच्छतागृहात जाऊन मोबाईल कॅमेर्‍याव्दारे व्हीडीओ क्लिप बनवून ती व्हायरल केल्याची घटना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) घडली. याप्रकरणी कॉलेज प्रशासनाने चार विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. त्यानंतरही संबंधित विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या क्लासरुममध्ये जाऊन विद्यार्थिनींना धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतची माहिती समजताच बुधवार दि. 13 रोजी संताप व्यक्त करत एनएसयुआयचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवराज मोरे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्यांना घेराव घातला. याप्रकरणी जनतेतून संतप्त भावना व्यक्त केला जात आहेत. 

येथील आयटीआय कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्‍या काही विद्यार्थ्यांनी शुक्रवार दि. 8 रोजी विद्यार्थीनी स्वच्छतागृहात जाऊन मोबाईल कॅमेर्‍याव्दारे व्हिडीओ क्लिप बनवली. ती क्लिप कॉलेजमध्ये व्हायरल झाल्याची माहिती मिळताच संबंधित मुलींनी सोमवार दि. 11 रोजी ही बाब कॉलेज प्रशासनास सांगितली. त्यानंतर प्राचार्य टी. एन. मिसाळ यांनी चार विद्यार्थ्यांना निलंबित केले. आपल्याला निलंबित केल्याची माहिती मिळताच संबंधित विद्यार्थ्यांनी त्याच दिवशी कॉलेजच्या वेळेत क्लासरुममध्ये जाऊन क्लास सुरु असतानाच ‘तुम्हाला सोडत नाही, काय करायचे ते करा’, असे म्हणून मुलींना धमकी दिली. 
याबाबात बुधवारी कराड पोलिस ठाण्याच्या निभर्या पथकाला बोलवून प्राचार्यांनी घडलेला प्रकार सांगितला. निर्भया पथकातील पोलिसांनी प्राचार्यांना रितसर तक्रार देण्यास सांगितले.  
दरम्यान, हा प्रकार एन.एस.यु.आय.च्या कार्यकर्त्यांना समजला. एनएसयुआचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवराज मोरे, दिग्विजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी कॉलेजवर जाऊन प्राचार्यांना घेराव घालत प्रश्‍नांचा भडीमार केला. संबंधित विद्यार्थ्यांना निलंबित करूनही तो कॉलेजच्या आवारात मोकाट कसा काय फिरत आहे? त्याला कॉलेजचे प्रशासन पाठीशी घालत आहे का? निलंबनानंतर त्यांचे आयकार्ड का जप्त केले नाही?, जुजबी कारवाई करून कारवाई केल्याचे 

नाटक प्रशासनाकडून केले जात आहे.  शुक्रवारी प्रकार घडूनही तो सोमवारी क्लासरूममध्ये येऊन दमबाजी करून मुलींमध्ये दहशत माजविण्याचा प्रकार करत असताना कॉलेजने आत्तापर्यंत पोलिसात तक्रार का दिली नाही? संबंधित विद्याथ्यार्ंवर कडक कारवाई झालीच पाहिजे. तसेच याप्रकरणात हलगर्जीपणा करणार्‍या शिक्षक व इतरांवरही कॉलेज प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.