Fri, Jul 10, 2020 18:12होमपेज › Satara › सातार्‍यात जुगार अड्ड्यावर छापा

सातार्‍यात जुगार अड्ड्यावर छापा

Last Updated: Nov 17 2019 1:24AM
सातारा प्रतिनिधी

 बुधवार नाका येथे शनिवारी सांयकाळी उपविभागीय पोलिस कार्यालय व शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना अटक केली. संशयितांकडून दुचाकी, मोबाईल, रोकड व जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, सर्व संशयित बुधवार नाका परिसरातील आहेत.

सनी धनाजी भिसे, शिवम विनोद कांबळे, मनोज संपत माने, अजय सदाशिव आवळे, सोमनाथ वायदंडे, शामराव यशवंत कुर्‍हाडे (सर्व रा.बुधवार नाका) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, बुधवार नाका येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना समजली. सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पोलिसांचे पथक तयार करुन घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही काळ गोंधळ झाल्याने तणाव निर्माण झाला.

दरम्यान, पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व साहित्य जप्त केले. जप्तमध्ये रोख 14 हजार रुपये, दोन दुचाकी, चार मोबाईलचा समावेश आहेे. पोलिसांनी छापा टाकल्याचे समजताच परिसरात बघ्यांची गर्दी झाली. सर्व संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हवालदार बालम मुल्ला, अंकुश यादव, मंगेश डोंबे, लैलेश फडतरे, हसन तडवी यांनी कारवाईत सहभाग घेतला.