Sat, Jul 04, 2020 03:41होमपेज › Satara › राजू शेट्टी यांच्याकडून उदयनराजेंच्या मनधरणीचे प्रयत्न?

राजू शेट्टी यांच्याकडून उदयनराजेंच्या मनधरणीचे प्रयत्न?

Published On: Sep 04 2019 1:27PM | Last Updated: Sep 04 2019 1:27PM

खासदार उदयनराजे भोसले आणि स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टीसातारा : पुढारी ऑनलाईन

साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले. आता स्वाभिमानीचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे उदयनराजेंची मनधरणी करण्यासाठी त्यांची भेट घेत आहेत. आज ते उदयनराजेंना भेटणार असल्याचे समजते.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी साताऱ्यात जाऊन उदयनराजेंची भेट घेऊन त्यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा केली. त्यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यामार्फत मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला का? या प्रश्नावर खा. उदयनराजे म्हणाले होते की, माझी मनधरणी दुसरे कोणी करु शकत नाही. माझ्या बुध्दीला पटलं तरच माझी मनधरणी होऊ शकते. या भेटीत राजकीय चर्चाही झाली. जे इश्यू बेस असतील. मला पटलं तर ठिक नाहीतर कुणीही असू दे मी भीक घालत नाही.

उदयनराजे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिल्‍ली येथे उदयनराजेंचा प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यासंदर्भात मुख्यमंत्री स्वत:च आग्रही असल्याचे समजते.