होमपेज › Satara › कास पठारावर भीषण वणवा

कास पठारावर भीषण वणवा

Published On: Apr 22 2018 3:12PM | Last Updated: Apr 22 2018 3:11PMबामणोली : वार्ताहर

जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावर अज्ञातांनी वणवा लावला असून आगीने उग्र रूप धारण केले होते. एकीव गावच्या बाजूने लावलेला हा वणवा कास पठाराच्या मुख्य बाजूने येत होता. कास पठारावरील समिती कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वनव्याच्या दिशेने धाव घेतली भर कडक उन्हात हा वणवा लावल्याने कर्मचाऱ्यांना वणवा विजवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. 

पाणी भरून गाडी उभी असताना रस्त्याअभावी गाडी देखील आत नेता आली नाही. तरी देखील सर्व कर्मचाऱ्यांनी झाडाचा ओला पाला काढून आपला जीव धोक्यात घालून वणवा विझवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते. अखेर पुन्हा एकीव गावाच्या कड्याकडील बाजूला वणवा वळवण्यात यश आल्याने वनव्याचे उग्र रूप कमी झाले.