Wed, Jul 08, 2020 11:17होमपेज › Satara › साताऱ्याच्या हद्दवाढीला मध्यरात्री मंजुरी (video)

साताऱ्याच्या हद्दवाढीला मध्यरात्री मंजुरी (video)

Published On: Sep 16 2019 12:24PM | Last Updated: Sep 16 2019 12:49PM

साताऱ्याच्या  हद्दवाढ शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर झाली.सातारा : प्रतिनिधी

गेली ४० वर्षांपासून रखडलेली सातारा शहराची हद्दवाढ शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर झाली. भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त साताऱ्यात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याच्या हद्दवाढीची घोषणा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडून माहिती घेतली आणि मध्यरात्री सातारा हद्दवाढीला मंजुरी मिळाली. 

सातारा शहराची हद्दवाढ व्हावी, यासाठी दै. 'पुढारी' रेटा उभा केला होता. हद्दवाढ रखडल्यामुळे शहरातील व त्रिशंकू भागातील समस्यांवर वृत्तमालिकेच्या माध्यमातून झोत टाकला होता. महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर 'मुख्यमंत्री साताऱ्याला काय देणार' हे वृत्त प्रसिद्ध केले होते.

हद्दवाढीसाठी वारंवार आवाज उठवला होता. पावसाळी अधिवेशनात शिवेंद्रराजे यांनी हद्दवाढीसाठी लक्षवेधी मांडली. त्यानंतर महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषद आणि सातारा पालिकेने नगरविकास खात्याने काढलेल्या त्रुटी दूर करून फ्रेश प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर महाजनादेश यात्रेतही शिवेंद्रराजे यांनी भाषणात प्रथम हद्दवाढीची मागणी केली होती. हीच मागणी उदयनराजे यांनीही उचलून धरली. मुख्यमंत्र्यांनी सातारा हद्दवाढीस सोमवारी मध्यरात्री मंजुरी दिली. हद्दवाढ झाल्यामुळे शहरात पूर्वेकडे राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा भाग, पश्चिमेकडे दरे बुद्रुक ग्रामपंचायत हद्द, दक्षिणेकडे अजिंक्यतारा किल्ला पायथा, उत्तरेस वेण्णा नदी हा भाग समाविष्ट होणार आहे. शाहूपुरी, संभाजीनगर, विलासपूर, दरे बुद्रुक या ग्रामपंचायती हद्दवाढीमुळे शहरात हद्दीत येणार आहेत.