Mon, Jul 06, 2020 18:04होमपेज › Satara › अंगणवाडीताईंना ड्रेसकोडची प्रतीक्षा

अंगणवाडीताईंना ड्रेसकोडची प्रतीक्षा

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 06 2017 8:38PM

बुकमार्क करा

रेठरे बु : दिलीप धर्मे 

शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना डे्रसकोडची सक्ती केली आहे.त्यासाठी शासनाकडूनच ताईंना मे,जून महिन्यात साडी खरेदीसाठी प्रत्येकी 425 रू.प्रमाणे रक्कमही देवू केली आहे.आज पैसे देवून सहा महिन्याचा काळ लोटला तरीही ताईंना  ड्रेसकोड असणारी साडी मिळाली नाही. दरम्यान, साडी नसेल तर पैसे तरी परत द्या,अशी मागणी सेविकांमधून पुढे येऊ लागली आहे. 

एकात्मिक बालविकास केंद्र पं.स.च्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात अंगणवाडीच्या शाळा सुरू आहेत.3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी या शाळा महत्वपूर्ण ठरल्या आहेत.मूलभूत पायाभूत शिक्षणा बरोबर आहार, आरोग्या बरोबर अनेक उपक्रम शाळेत राबविल्या जात आहेत.शासन यासाठी करोडो रूपये खर्च करत आहे. 2012 पासून अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना ड्रेस कोड असावा यासाठी शासन साडी घेण्यासाठी काही रक्कम देत आहे.

2017 ते 2018 या वर्षासाठी शासनाने ताईंना प्रतिसाडी 425 रू रक्कम दिले आहेत.ताईंनी ते पैसे कार्यालयाकडे जमा करून 6 महिने झाले असून साडी देण्याची जबाबदारी कोणाची हा संशोधनाचा विषय पुढे आला आहे. कराड दक्षिण विभाग बिटमध्ये साधारण 356 शाळेत तेवढ्याच सेविक व मदतनिस असून मिनींच्या 43 शाळा धरल्यास हा आराखडा 755 होत आहे.तर उत्तरेला 316 शाळेत सेविकांबरोबर 283 मदतनिस आहेत.  

या सर्वांना शासनाकडून 425 रू.आले आहेत याचा हिशोब केल्यास साधारण हा आकडा पावणे सहा लाखांच्या घरात जात आहे.ऐवढे पैसे असूनही गेली सहा महिने साडीचा पत्ता नसल्याचे दिसून येत आहे.येत्या मार्चला आता दुसर्‍या साडीचे पैसे येतील तरीही पहिल्या साडीचे दुकान सापडत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.याचे गौडबंगाल काय असाही प्रश्‍न यानिमित्ताने पुढे आला आहे.