Sun, Jul 05, 2020 04:10होमपेज › Satara › कराडात आजी-माजी आमदार एकत्र येतात, हाच माझा विजय : डॉ. भोसले

कराडात आजी-माजी आमदार एकत्र येतात, हाच माझा विजय : डॉ. भोसले

Published On: Oct 06 2018 3:24PM | Last Updated: Oct 06 2018 3:24PMकराड : प्रतिनिधी

कराड दक्षिणमध्ये गेल्या चार वर्षात कोट्यावधींचा निधी मिळाल्याने चौफेर विकास सुरू आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि सलग ३५ वर्ष कराड दक्षिणचे प्रतिनिधीत्व केलेले माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांना एकत्र यावे लागले आहे. काही ग्रामपंचायत निवडणुकीत हे पहावयास मिळाले असून आपला पराभव करण्यासाठी त्यांना एकत्र यावे लागले, हाच आपला विजय असल्याचा टोला डॉ. अतुल भोसले यांनी लगावला आहे.

कृष्णा हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भोसले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही गट एकत्र आले तरी भाजपाचाच नगराध्यक्ष विजयी होणार असून भाजपालाच पूर्ण बहुमत मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर गटातील सख्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे राज्यात भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधक एकवटले, तरी त्याचा भाजपावर काहीही परिणाम होणार नाही, असे भोसले यावेळी म्‍हणाले.