Thu, Jul 02, 2020 10:32होमपेज › Satara › फलटणला 20 गावांत उपसरपंच निवडी; 13 ठिकाणी बिनविरोध

फलटणला 20 गावांत उपसरपंच निवडी; 13 ठिकाणी बिनविरोध

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

फलटण तालुक्यातील नुकत्याच निवडणुका झालेल्या 24 ग्रामपंचायतींपैकी 20 गावात उपसरपंच निवडी पार पडल्या. यापैकी 13 ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या तर उर्वरित गावात मतदान घ्यावे लागले.

फलटण तालुक्यातील 24 गावांच्या नुकत्याच निवडणुका होवून थेट सरपंच व सदस्यांची निवड झाली होती. त्यापैकी 20 गावात उपसरपंचांची निवड शनिवारी करण्यात आली. यावेळी सुरवडी, वडले, तरडफ, मिरेवाडी, ताथवडा, झडकबाईचीवाडी, मठाचीवाडी, पाडेगाव, वेेळोशी, चव्हाणवाडी, कुसूर, गिरवी आणि मानेवाडी या 13 ठिकाणी उपसरपंच निवडी बिनविरोध पार पडल्या. तर सालपे येथे 5 विरुध्द 3, चौधरवाडी येथे 6 विरुध्द 5, पिंप्रद येथे 6 विरुध्द 5, सोमंथळी येथे 7 विरुद्ध 4, बरड येथे 9 विरुद्ध 4, विडणी येथे 12 विरुद्ध 3 आणि कुरवली खुर्द येथे 5 विरुद्ध 4 असे मतदान होवून उपसरपंच निवडी पार पडल्या आहेत. 

तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे व सहकायांनी उपसरपंच निवडीसाठी सर्व ग्रामसेवकांना विशेष प्रशिक्षण देवून पूर्ण तयारी केली होती