Wed, Dec 02, 2020 08:48होमपेज › Satara › सांगली : अत्यावश्यक सेवेतील हमालांना पोलिसांची मारहाण

सांगली : अत्यावश्यक सेवेतील हमालांना पोलिसांची मारहाण

Last Updated: Mar 26 2020 9:52AM

संग्रहित छायाचित्रसांगली : पुढारी वृत्तसेवा

तहसीलदार यांच्या ओळखपत्रासह शासकीय धान्य गोदामामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी काम करण्यास गेलेल्या हमालांना पोलिसांनी मारहाण केली. जत, इस्लामपूरसह इतर ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे गुरुवारपासून अत्यावश्यक सेवेसाठीही हमाल कामावर जाणार नाहीत, अशी माहीती हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मगदूम यांनी दिली.

सांगली जिल्ह्यात १३ शासकीय धान्य गोदाम आहेत. ही गोदामे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात आहेत. या गोदाममध्ये शासनाच्या माथाडी मंडळाचे नोंदणीकृत हमाल काम करत आहेत. सध्या त्यांना तहसिलदार यांचे सहीशिक्का असलेले अत्यावश्यक सेवाचे ओळखपत्र दिले आहे. बुधवारी जत येथील शासकीय धान्य गोदाममध्ये मिरजेहुन धान्य भरून गेलेल्या गाड्या उतरून प्रमाणीकरण करुण घेणेचे कामास सुट्टी असूनही हमाल यांना बोलावुन घेण्यात आले होते.

सांयकाळी ७.४६ वाजता काम संपवून रामपुर गावी घरी जात असताना जत पोलिसानी मारहाण केली. हमालांनी तहसीलदार यांनी दिलेले ओळख पत्र, माथाडी मंडळाचे ओळख पत्र दाखवूनही मारहाण केली आहे. उद्यापासून कामास यायचे नाही, अशा पध्दतीने भाषा वापरली आहे.

मंगळवारी इस्लामपूरमध्येही मारहाण झाली आहे. पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे गुरुवारपासून जिल्ह्यातील १३ शासकीय धान्य गोदाममधील हमाल कामावर जाणार नाहीत. हमालानी सध्याच्या कठीण काळात जीव धोक्यात घालुन गोरगरीब जनतेला धान्य पोहचावे म्हणून काम सुरु ठेवले होते. पण पोलिसांच्या वागणुकीमुळे हमालांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे मगदूम यांनी सांगितले.