Fri, Jul 03, 2020 04:04होमपेज › Satara › कोरोना मयत रुग्णावर अंत्यसंस्कार केल्यानंतर कोरोना वॉरियर काय करतात? (video)

कोरोना मयत रुग्णावर अंत्यसंस्कार केल्यानंतर कोरोना वॉरियर काय करतात? (video)

Last Updated: May 29 2020 9:47PM

अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरलेले सर्व साहित्य जाळून टाकले जाते.कराड (सातारा) : पुढारी वृत्तसेवा

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची उत्पती ही चीनमध्ये झाली. चीनमधून या व्हॉयरसने जगभरात हातपाय पसरले. कोरोना बाधित रुग्ण बरेही होत आहेत. पण मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही तितकेच आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून काही नियम घालून दिले आहेत. 

वाचा :सातारा जिल्ह्यात 30 पॉझिटिव्ह

कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार कार्यवाही केली जाते. ज्या रुग्णावर अंत्यसंस्कार करायचे आहे, त्याचे पार्थिव संबंधित रुग्णालयाकडून त्या क्षेत्रातील नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीकडे पाठवले जाते. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमलेले योद्धे त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना पीपीई किट प्रमाणे पोशाख घालतात. अंत्यसंस्कार झाल्यानंतर हे सर्व किट, पोशाख, कागद व अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरलेले सर्व साहित्य जाळून टाकले जाते.

वाचा : सातारा : प्रखर उन्हाने शिवसागर भेगाळला (video)