Wed, Aug 12, 2020 09:30होमपेज › Satara › तामजाईनगरात भरदिवसा घरफोडी

तामजाईनगरात भरदिवसा घरफोडी

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 11:13PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

करंजे येथील तामजाईनगरात असणार्‍या रुद्राक्ष रेसिडेन्सीमधील डॉ. विकास कोठावदे यांचा फ्लॅट भरदिवसा फोडून चोरट्यांनी 7 तोळे वजनाचे दागिने आणि चांदीची भांडी असा सुमारे 2 लाखांचा ऐवज चोरून नेला. भरदिवसा घरफोडी झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डॉ. कोठावदे हे रुद्राक्ष रेसिडेन्सीमध्ये पत्नी, आई व दोन मुलींसोबत राहतात. कोठावदे दाम्पत्य शेंद्रे येथील ऑन्को लाईफ सेंटरमध्ये नोकरीस आहेत. दि. 9 रोजी नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर रात्री 7.30 च्या सुमारास फ्लॅटवर परतले.  

यावेळी त्यांना दाराचे कुलूप तुटल्याचे दिसले. घरात आल्यानंतर त्यांना आतील कपाटातील लॉकर उचकटल्याचे व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. चोरट्यांनी लॉकरमधील दागिने, भांडी असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याचे आढळले. याबाबत  गुन्हा दाखल असून तपास पोलिस उपनिरीक्षक भास्कर कदम करत आहेत.