Sat, Oct 31, 2020 13:41होमपेज › Satara › कास पुष्प पठारावर रानगव्याचे दर्शन

कास पुष्प पठारावर रानगव्याचे दर्शन

Last Updated: Oct 19 2020 1:22AM
बामणोली : पुढारी वृत्तसेवा

जागतिक वारसास्थळ असणार्‍या कास पुष्प पठाराचा यंदाचा हंगाम बंद ठेवण्यात आला आहे. कास पठारावर गर्दी नसल्याने पठार सुनेसुने झाले आहे. 

पर्यटक नसल्याने पठार निर्मनुष्य असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. याचाच पुरेपूर फायदा वन्यप्राणी घेत असून कधी कास पुष्प पठारावर तर कधी कास घाटाई फाटा पारंबे फाटा रस्त्यावर रानगवे, भेकर व इतर वन्यप्राणी येणार्‍या जाणार्‍या वाहनचालकांना अधून मधून दर्शन देत आहेत. शनिवारीही कास पठार परिसरात रानगव्याचे दर्शन झाले. फुले जरी पाहता येत नसली तरी वन्यप्राणी आवर्जून दर्शन देत असल्याने कास परिसरात फिरायला जाणारे सातारकर नागरिक हे वन्यप्राणी पाहून आनंदित होत आहेत.

 "