Wed, Aug 12, 2020 09:45होमपेज › Satara › दप्तराचे ओझे खरंच होणार का कमी?

दप्तराचे ओझे खरंच होणार का कमी?

Published On: Nov 30 2018 1:27AM | Last Updated: Nov 29 2018 10:42PMसातारा : मिना शिंदे

दप्‍तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना होणार्‍या पाठीच्या आजारांपासून सुटका होण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने केंद्र व राज्य स्तरावर मार्गदर्शिका जारी केली  आहे. पहिली व दुसरीला गृहपाठ बंद केले असून इतर वर्गांसाठी दप्तराची वजन मर्यादा आणखी कमी केली आहे. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होणार  आहे. या निर्णयाला मूर्त स्वरुप यावे. हा निर्णय कागदावरतीच न राहता खरंच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होणार का? असा संभ्रम पालकांमध्ये निर्माण होत आहे.

विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्या विषयी वारंवार निर्णय होत आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यात  अनेक मर्यादा येत आहे. काही शाळांमध्ये स्वाध्याय वह्या, स्वाध्याय पुस्तिका  शाळेतच जमा करुन घेतल्या जातात. शालेय कामकाजाच्या वेळतच विद्यार्थ्यांची स्वाध्याय पुस्तिका सोडवूण घेतली जाते. 

काही शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक अशा पध्दतीने तयार करण्यात आले आहे की, जेणे करुन एक विषय पुस्तक व दुसरा कार्यानुभव, कला, शारिरीक्षक शिक्षण असा अभ्यास घेतला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येताना केवळ एकाच विषयाचे पुस्तक आणावे लागत असल्याने दप्तराचे ओझे  होणार नाही. बाजरापेठेतही भाषा, गणित व इंग्रजी अशा एकत्र दोनशेपेजेस वही मिळत आहे. एका वहीमध्ये हे तीनही विषयाचे लिखान केले जावू शकते.

मात्र  माध्यमिक शाळांमध्ये अभ्यास व विषयांची व्याप्ती जास्त असल्याने  पुस्तक व वह्यांची संख्या जास्त येते. यामध्येही कृतिपुस्तिकांची भर पडत आहे. तसेच वेगवेगळ्या  प्रकल्पांचा समावेश वाढत आहे. त्यामुळे पाठ्यपुस्ते, किंवा  दररोजच्या वर्गपाठाच्या वह्या  शाळेतील विषयांच्या वेळापत्रकानुसार घेऊन जाणे अपरिहार्य असते. परिणामी दप्तराचे ओझे वाढत जाते. 

पाठ्यपुस्तकांबरोबर दप्तरामध्ये विविध विषयांची गॅझेटस्ची भर पडत आहे. सध्या कोचिंग क्लासेस, हॉबी क्लास, विविध शालाबाह्य परीक्षा याचा अभ्यास यामुळे विद्यार्थ्यांना खेळासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे   शाळेत एखादा ज्यादा तास मिळाल्यास इतर विषयांचे लिखान करता येईल या हेतून विद्यार्थी सुध्दा जास्तीचे किंवा वेळापत्रकाव्यतीरिक्तच्या वह्या पुस्तके दप्तरामध्ये ठेवत असल्यानेही दप्तराचे ओझे वाढत आहे. विद्यार्थी कौशल्य विकासाच्या नावाखाली सुरु झालेले प्राजेक्टचे भूत विद्यार्थ्यांसह पालकांच्या मानगुटीवर बसले आहे. त्याचा अतिरिक्त भार विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडत आहे. प्रोजेक्टसाठी घरी वेळ कमी पडत असल्याने काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गटागटाने एखादा प्रोजेक्ट तयार करावयास दिला जातो. त्याचे साहित्य विद्यार्थी शाळेत आणतात व शालेय वेळेत एकत्रीतरित्या हे प्रोजेक्ट तयार करतात. त्यासाठी लागणारे पेन पेनिस्टिी, कात्री, गम, इलेक्ट्रिक साहित्य, रंगपेटी अशा साहित्याची जंत्री स्कूल बॅगमध्ये जागा घेत आहे. त्यामुळे  शासनाचा निर्णय झाल्यानंतरही विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे खरोखरच कमी होणार का असा  संभ्रम पालकांमध्ये आजही कायम आहे.

ओझे कमी झाल्याने होणार फायदा...

दप्तराचे ओझे कमी झाल्यास विद्यार्थ्यांच्या पाठ, मान व खांदे दुखी कमी होईल. मणका आणि सांध्यांना येणारा ताण कमी होणार आहे. पाठीला बाक येणे, मणक्यांचे आकार बदलणे अशा समस्या कमी होतील. दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी दमछाक कमी झाल्याने अभ्यासासाठी उत्साह वाढेल. चांगली शारीरिक वाढ होण्यास मदत होईल.