होमपेज › Satara › कराड-चांदोली मार्गावर अपघातात विद्यार्थी ठार

कराड-चांदोली मार्गावर अपघातात विद्यार्थी ठार

Published On: Apr 25 2018 10:57AM | Last Updated: Apr 25 2018 11:00AMकराड : प्रतिनिधी

कराड-चांदोली मार्गावरील उंडाळे (ता. कराड, जि. सातारा) गावच्या हद्दीत प्रवाशी वाहतूक करणारी अॅपे रिक्षा पलटी होऊन झालेल्या  अपघातात सुजित सभांजी वीर (वय 17, रा. तुळसण, ता. कराड) हा विद्यार्थी जागीच ठार झाला. या अपघातात इतर चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मलकापूर (ता. कराड) येथील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना आज (बुधवार दि.25) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. वानरांच्या मागे लागलेली कुत्री रिक्षाच्या आडवी आल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. 

Tags : auto, accident, karad chandoli road, student, death, satara news