Wed, Jan 20, 2021 10:02होमपेज › Satara › सातारा : विद्यार्थ्यांकडून कोरोनाबाबत जागृती करणाऱ्या ‘अंतर’ शॉर्टफिल्मची निर्मिती

सातारा : विद्यार्थ्यांकडून कोरोनाबाबत जागृती करणाऱ्या ‘अंतर’ शॉर्टफिल्मची निर्मिती

Last Updated: May 23 2020 4:23PM

अंतर शॉर्टफिल्म 

 

कराड : पुढारी वृत्तसेवा

देशभरात गेल्या 60 दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. खरंतर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्या घोषित करण्यात आल्या. स्वाभाविकपणे कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठात शिकणारे अनेक विद्यार्थीही लॉकडाऊनमुळे घरीच होते. या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनचा सदुपयोग करत कोरोनाबाबत जनजागृती करणारी ‘अंतर’ ही शॉर्टफिल्म तयार केली आहे. यू ट्यूबवर अपलोड करण्यात आलेली ही शॉर्टफिल्म आत्तापर्यंत 1500 हून अधिक लोकांनी पाहिली आहे.

वाचा : सातार्‍यात एका रात्रीत ४१ जण पॉझिटिव्ह 

कोरोनाबाबत समाजात आजही मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी, याबाबत सर्वस्तरावरून जागृती होत असतानाही काही लोक याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहेत. या विषयावर भाष्य करणारी आणि कोरोना काळात स्वत:ची काळजी कशी घ्यावी, याबाबतचा संदेश देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून केला आहे.
कृष्णा विद्यापीठाच्या सामाजिक चिकित्सा व निवारण (पीएस्‌एम्‌) विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या शार्टफिल्मचे लेखन ऋषी अगरवाल, दिग्वीजय शिंदे आणि अंचित गुलाटी यांनी केले असून, ऋषी अगरवाल व दिग्वीजय शिंदे यांनी दिग्दर्शन केले आहे. या शॉर्टफिल्ममध्ये अलंकृता राव, रोनाल्ड काब्राल, सत्यजीत जगताप आणि मृणाली शर्मा यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. 

वाचा : सातारा : कोरोना बाधितासह ३ संशयितांचा मृत्यू

या फिल्मच्या निर्मितीसाठी पीएसएम विभागाचे प्रमुख डॉ. पी. एम. दुर्गावळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. लॉकडाऊनचा सदुपयोग करत कोरोनाबाबत जागृतीपर शॉर्टफिल्म तयार करणाऱ्या कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या या विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.