Tue, Sep 22, 2020 09:15होमपेज › Satara › सातारा : डबलसीटवर कारवाईचा धडाका (video)

सातारा : डबलसीटवर कारवाईचा धडाका (video)

Last Updated: Jul 03 2020 2:11PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा शहरात गेल्या आठ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी राजवाडा, पोवई नाका, जिल्हा परिषद, बॉम्बे रेस्टॉरंट या ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली. डबलसीट आणि तोंडाला मास्क नसलेल्या वाहनचालकांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शहरांमध्ये टू व्हीलर वर दोन व्यक्ती बसू नये व चार चाकीमध्ये तीन व्यक्ती पेक्षा जास्त असू नये. तोंडावर मास्क असावा, अशा सूचना देत नागरिकांना आव्हान केले आहे. शहरात ठिकठिकाणी रुग्ण आढळून येत असल्याने परिस्थिती गंभीर होत आहे.
 

 "