Sun, Aug 09, 2020 02:26होमपेज › Satara › जि.प.ची आरक्षण सोडत मंगळवारी

जि.प.ची आरक्षण सोडत मंगळवारी

Last Updated: Nov 17 2019 1:24AM
सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषदेमध्ये पुढील अडीच वर्षांची आरक्षण सोडत (ड्रॉ) मंगळवारी (दि. 19) मुंबई येथे काढण्यात येणार असून त्याकडे  राजकीय वर्तुळाचे लक्ष आहेच; परंतु जिल्हा परिषदेत पदांसाठी इच्छुक असलेल्यांना या सोडतीची जास्त उत्सुकता लागून राहिली आहे. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली तरी विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे पक्षीय बलाबल बदलले जाणार असल्याने आगामी काळात नेमकी परिस्थिती काय राहील, यावरच सत्तासंघर्ष रंगणार आहे.  राष्ट्रवादी व काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या नेत्यांच्या समर्थकांनी अद्यापही पक्षीय धोरण जाहीर केले नाही. पदाची संधी मिळते किंवा कसे यासाठी त्यांची वेट अँड वॉचची भूमिका असणार आहे. बदलत्या समीकरणांमुळे इच्छुकांची मात्र पदावर वर्णी लागण्यासाठी राजकीयकसोटी होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ दि. 21 सप्टेंबर 2019 रोजी संपला आहे.मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकार्‍यांना 4महिनेमुदतवाढ दिली आहे. तीमुदतवाढ डिसेंबरअखेर  संपत आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षाच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडतमंगळवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजतामंत्रालयातील सातव्यामजल्यावरील परिषद सभागृहात गृह विभागाचे अप्परमुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे  व इच्छुकांचे या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. 

जिल्हा परिषदेचे पहिल्या अडीच वर्षासाठी सर्वसाधारण पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यासाठी तरडगाव गटातून निवडून आलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांची या पदावर एकमताने वर्णी लागली. उपाध्यक्ष पदासाठी  म्हसवे गटातून निवडून आलेले व आ.शिवेंद्रराजे यांचे कट्टर समर्थक वसंतरावमानकुमरे यांची नियुक्ती झाली. शिक्षण सभापतीपदासाठी राजेश पवार, कृषी सभापतीपदीमनोज पवार, समाजकल्याण सभापतीपदासाठी शिवाजी सर्वगोड,महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे यांची पहिल्या अडीच वर्षांसाठी निवड करण्यात आली होती. या निवडींचा कार्यकाल संपला असून पुढील निवडींच्या आरक्षण सोडतीकडे इच्छूकांचे लक्ष लागून राहिले होते. आता ही आरक्षण सोडतमंगळवारी होणार आहे. 

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व  आहे.मात्र, सध्या  सातारा,माण व कोरेगाव तालुक्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. त्यामुळे  अनेक दिग्गजांनी पक्षबदल केला असल्याने  जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे असलेले बलाबल शाबूत राहणार का? की  मिनीमंत्रालयालाही भगदाड पडणार हे येणारा काळच ठरवणार आहे. सातारा जिल्ह्यात उपाध्यक्ष पदासह विषय समिती सभापती व पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बांशिग बांधून बसले आहेत. आरक्षण घोषित झाल्यानंतर  जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्वासाठी पदाधिकार्‍यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. पदाधिकारी निवडीत अनेक दिग्गज नेंत्यांना डोकेदुखी सहन करावी लागणार आहे. मिनीमंत्रालयातील खुर्चीसाठी अनेकजण इच्छूक आहेत. त्यामुळे या सत्ता संघर्षात कोणत्या तालुक्याला झुकतेमाप मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

सदस्यांच्या पक्षीय भूमिका पदाच्या संधीवर अवलंबून
सातारा जिल्हा परिषदेमध्ये 64 सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे 39 सदस्य आहेत. भारतीय जनता पार्टीचे 7,  राष्ट्रीय काँग्रेसचे 7, सातारा विकास आघाडी 3, कराड तालुका विकास आघाडी 3, शिवसेना 2 व पाटण विकास आघाडी 1 व अपक्ष 2 असे पक्षीय बलाबल आहे. 2 अपक्षांपैकी एक राष्ट्रवादीसोबत व एक सेनेसोबत आहेत. आधी लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकीत श्री.छ. उदयनराजे भोसले, आ.शिवेंद्रराजे भोसले, खा. रणजितसिंह ना. निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. धैर्यशील कदम यांनी सेनेत तर दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मनोज घोरपडे हे विधानसभेला अपक्ष लढले. याशिवाय मान्यवर इकडून तिकडे गेल्याने पक्षीय बलाबल बदलले जाणार आहेत. पदाची संधी पाहूनच सदस्य आपल्या भूमिका जाहीर करण्याची शक्यता त्यामुळेच बळावली आहे.