Sat, Dec 05, 2020 22:32होमपेज › Satara › दिव्‍यांग वारकर्‍याची इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर वारी (vdeo)

दिव्‍यांग वारकर्‍याची इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर वारी (video)

Published On: Jul 02 2019 1:43PM | Last Updated: Jul 02 2019 1:43PM
सातारा : प्रतिनिधी 

माऊलींच्या वारीला जाण्यासाठी सशक्त असले पाहिजे असे काही नाही, फक्त वारीला जायची इच्छा आणि मनात सच्‍छा भाव असला तर तो वारीला जाऊ शकतो. दिव्‍यांग असतानाही हा वारकरी माऊलींच्‍या दर्शनासाठी पायी चालत आहे. त्‍याच्‍या मनाला ओढ लागली आहे ती माऊलींच्या भेटीची. बीड जिल्ह्यातील उकळी गावचे गणेश शिंदे हे दिव्‍यांग असतानाही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर वारी करत आहेत. वारीतून मला आत्मिक समाधान मिळते वर्षभराची ऊर्जा मिळते, असे त्यांनी सांगितले.

गणेश शिंदे गेले पंधरा ते सोळा वर्षे वारी करत आहेत. दिव्‍यांग असतानाही ते पायी वारी करत आहेत. त्‍यांच्‍या इच्छाशक्तीला सलाम. वारीत येणार्‍या प्रत्‍येक वारकर्‍याची वेगळी ओळख असते, या प्रत्‍येक वारकर्‍याकडून शिकण्‍यासारखे काहीना काही असतेच. गणेश शिंदे यांच्‍याकडून अशीच प्रेरणा मिळते व वारीचे महत्‍व समजते. 

पंढरीच्या वारीत मोकळ्या समाजात चालणारे वारकरी आपले स्वतःचे साहित्य गाठोड्यामध्ये बांधून चालत असतात. या वारकऱ्यांसाठी साहित्य न्यायला कोणतीही व्यवस्था नसते. मुक्कामाच्या ठिकाणी जाताना डोक्यावर गाठोडे बांधून महिला चालतात तर पाठीशी  बॅग, गाठोडे घेऊन पुरुष वारकरी चालत असतात. आपल्‍याच साहित्‍याचे ओझे स्वतःच्या खांद्यावर, डोक्यावर घेऊन चालण्याशिवाय वारकऱ्यांसमोर दुसरा कुठला पर्याय नसतो. पण यातही एक वेगळाच आनंद असतो असे वारकरी सांगतात. तो आनंद या वारकर्‍यांच्‍या चेहर्‍यावर देखील पाहायला मिळतो. 

वारकऱ्यांचे नीरा स्नान 

ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नदीमध्ये माऊलींना स्नान घालण्यात येणार आहे. पालखी सोहळा पोहोचण्या अगोदर मोकळा समाजातील वारकरी या निरेत पोहोचलेले आहेत. भर पावसात हे वारकरी नीरा नदीमध्ये स्नान करत आहेत.