Mon, Aug 03, 2020 14:44होमपेज › Satara › मकरसंक्रातीनिमित्त साताऱ्यात महिलांची मंदिरामध्ये गर्दी (video)

मकरसंक्रातीनिमित्त साताऱ्यात महिलांची मंदिरामध्ये गर्दी (video)

Last Updated: Jan 15 2020 4:54PM

मकरसंक्रातीनिमीत्त महिलांची मंदिरामध्ये गर्दीसातारा : प्रतिनिधी

सातार्‍याची बाजारपेठ मकर संक्रातीसाठी फुलली आहे. सुगडी, लुटायचे वाण, हळदी-कुंकू, ओवसाचे साहित्य खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. दरम्यान महिलांनी एकमेकांना तिळगूळ देवून 'तिळगूळ घ्या गोडगोड बोला', अशा शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा : सातारा : नागेवाडीतील महिलांचा दारू विक्रेत्याविरोधात मोर्चा (video)

हळदी-कुंकू या सणातील महत्त्वाचा भाग आहे. मकर संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत महिला एकमेकींना घरी बोलावून हा सोहळा साजरा करतात. हळदी-कुंकूसाठी येणार्‍या महिलांना वाण म्हणून भेट वस्तू देतात. संक्राती निमित्त शहरातील विविध मंदिरांसह शेंद्रे येथील भवानी माता मंदिर व करंजे येथील भैरवनाथाच्या मंदिरात महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

अधिक वाचा : पिलासाठी तिचा जीव झाला कासावीस..