Sat, Jul 11, 2020 10:23होमपेज › Satara › दोन बाधितांचा बळी; १४ पॉझिटिव्ह रुग्ण

दोन बाधितांचा बळी; १४ पॉझिटिव्ह रुग्ण

Last Updated: Jul 01 2020 8:05AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात मुंबई-पुणेसह अन्य ठिकाणचे नागरिक आल्याने गेले चार दिवस मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळले. त्याच तुलनेत मृत्यूही वाढत असल्याने प्रशासनाला चिंता लागली आहे. मंगळवारी शेजवळवाडी (ता. पाटण) येथील 58 वर्षीय पुरुष व वडगाव, उंब्रज येथील 59 वर्षीय पुरुष या दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

जिल्ह्यात पुणे-मुंबईसह अन्य ठिकाणाहून नागरिक जिल्ह्यात आल्याने बाधितांचा आकडा वाढला आहे. बाधितांनी 1 हजारांचा आकडा पार केला आहे. बाधितांची संख्या वाढण्याबरोबरच आता मृतांचाही आकडा वाढू लागला आहे. मंगळवारी सकाळी शेजवळवाडी ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष व वडगाव उंब्रज ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या आता 45 झाली आहे. त्याचबरोबर आणखी 14 रूग्णांची भर पडली. 

दिवसभरात पाटण तालुक्यातील शेंडेवाडी येथील 18 वर्षीय युवक, 45 व 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरूष, कुसरूंड येथील 40 वर्षीय पुरूष चोपडी येथील 60 वर्षीय महिला असे एकूण 6 जण बाधित सापडले आहेत. याचबरोबर कराड तालुक्यातील कराड शहरातील गजानन हौसिंग सोसायटी येथील 40 वर्षीय पुरूष चरेगाव येथील 32 वर्षीय पुरू, शिवडे येथील 36 वर्षीय पुरूष, तारूख येथील 70 वर्षीय पुरू, कोयना वसाहतीतील 10 वर्षाचा चिमुरडा, विद्यानगर सैदापूर येथील 26 वर्षीय महिला, मलकापूर येथील 26 वर्षीय पुरूष, नडशी येथील  31 वर्षीय महिला असे एकूण 8 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे दिवसभरात 14 बाधित सापडले आहेत. 

कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या ठिकाणच्या क्षेत्रात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. तर  बाधित कोरोनामुक्त झाल्याने ठिकाणचे प्रतिबंधित क्षेत्र शिथिल करण्यात आले आहे. जिल्ह्याचा बाधितांचा आकडा 1045 झाला असून आतापर्यंत 740 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 240 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत.