Fri, Dec 04, 2020 04:38होमपेज › Satara › सालपेच्या उपशावर कोणाची मेहरनजर?

सालपेच्या उपशावर कोणाची मेहरनजर?

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 21 2017 12:14AM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

जावली तालुक्यातील अनधिकृत वाळूचा विषय ऐरणीवर आला असून, सनपाने येथे डंपरवर झालेल्या कारवाईनंतर या क्षेत्रातील खाबुगिरी चव्हाट्यावर आली आहे. सनपानेच्या तलाठ्यांनी केलेल्या कारवाईतील वाळू  पिंपोडे-सालपे येथील असल्याचे स्पष्ट झाले होते. या अनधिकृत वाळू उपशावर महसूल विभागातील कुणाची मेहरनजर आहे, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. 

जिल्ह्यात सर्वत्र नदी, ओढ्यावरील वाळू उपसा बंद करण्याचे आदेश  जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून पिंपोडे-सालपेच्या ओढ्यावर भुई फाडून राजरोसपणे रोज आठ ते दहा जेसीबी आणि पोकलॅनच्या साहाय्याने रोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृत वाळूचा पुरवठा हा सालपेतून होतो. मात्र, याची महसूल विभागाला माहिती का नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. अनधिकृत वाळू उपशाला स्थानिक महसूल विभाग मॅनेज झाल्याने हजारपती असलेला हा विभाग आता लखपती झाल्याची चर्चा सुरू आहे. वाई, जावली, सातारा, बारामती परिसरात गेल्या 3 महिन्यांत शेकडो वाळूचे डंपर भरून गेले आहेत. यामध्ये वाळू सम्राटांनी महसूल विभागालाच कडेवर घेतल्याचे चित्र आहे.