Sat, Jul 11, 2020 18:42होमपेज › Satara › उद्धव ठाकरेंना प्रभूरामांचे आशीर्वाद मिळतील : मुख्यमंत्री

उद्धव ठाकरेंना प्रभूरामांचे आशीर्वाद मिळतील : मुख्यमंत्री

Published On: Nov 26 2018 1:25AM | Last Updated: Nov 25 2018 11:44PMकराड : प्रतिनिधी 

राम मंदिर हा राजकीय मुद्दा नाही. श्रीराम भारताचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन दर्शन घेतले आहे. निश्‍चित त्यांना प्रभूरामांचे आशीर्वाद प्राप्त होतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

ज्येष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या कराड येथील समाधीस्थळी येऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ना. चंद्रकांत पाटील, आ. शंभूराज देसाई, ना. शेखर चरेगावकर, ना. डॉ. अतुल भोसले, ना. नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. 

यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना  उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यावरून छेडले असता त्यांनी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया दिली. 

मुख्यमंत्री म्हणाले, राम मंदिर व्हावे ही तमाम हिंदूंची भावना आहे.  त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तेथे जाऊन दर्शन घेतले याचा आनंद आहे. त्यांना निश्‍चित आशिर्वाद लाभतील. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी पहिले मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या प्रगतीचा पाया रचला आहे. त्यामुळे राज्याच्या प्रगतीच्या वाटा भक्कम झाल्या आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी काही भूमिका घेतली ती प्रगतीला पोषक होती.