Mon, Jul 06, 2020 04:00होमपेज › Satara › उदयनराजे म्हणजेच सातारा...

उदयनराजे म्हणजेच सातारा...

Published On: Feb 24 2018 1:12AM | Last Updated: Feb 24 2018 1:12AMखा. श्री. छ. उदयनराजे भासले म्हणजे सातारा आणि सातारा म्हणजेच खा. उदयनराजे असे समीकरणच गेल्या काही वर्षापासून सातार्‍यात तयार झाले आहे. समाजातील सर्व स्तरातील आणि सर्व जातीमध्ये उदयनराजेेंच्या कर्तृत्वाला भरभरुन साथ मिळत आहे. शिवरायांना ज्याप्रमाणे 18 पगड बहुजन समाज जातीतील मावळ्यांनी साथ दिली व स्वराजाचा संकल्प सोडला गेला. त्याच धर्तीवर सर्व जाती—धर्मातील व्यक्‍ती आज उदयनराजेंना आपला पोशिंदा मानत त्यांना मनापासून साथ देतात. यातच उदयनराजेंची किर्ती आणि यातच खरे तर त्यांचे यश सामावलेले आहे.

उदयनराजेंचा राजकीय उदय

साधारणपणे 1989 चा काळात सातारा तालुक्यात आणि जिल्ह्याच्या राजकारणात प्रस्थापितांचा दरारा असताना राजकारणात आणि समाजकारणात एका झंझावाताने प्रवेश केला. त्यावेळच्या प्रवाहाविरोधात दुर्दम्य इच्छाशक्‍ती आणि समाजाविषयी असणारी अंतरीक तळमळ असलेल्या एका वादळी व्यक्‍तीमत्वाचा राजकीय पटलावर उदय झाला होता. सन 1991 ची सातारा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक ‘उगवता सुर्य’ या चिन्हावर उदयनराजे भोसले यांनी लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात सातपेक्षा अधिक जागांवर त्यांच्या उमेदवारांनी सातारा नगरपरिषदेच्या राजकारणात शिरकाव केला.

वाचा : साहेबांनाही म्हणाले होते, माझ्याकडं तीन तिकिटं 

सन 1994—95 ची लोकसभा निवडणूक खा. उदयनराजे भोसले यांनी लोकाग्रहास्तव अपक्ष   लढवली आणि त्यावेळी सुमारे 1 लाखापेक्षा जास्त मते मिळवली. त्यांच्यामुळेच सातारा लोकसभा मतदारसंघात, शिवसनेचे तत्कालीन उमेदवार हिंदूराव नाईक—निंबाळकर यांना विजय मिळाला अशा तर्‍हेची मांडली गेलेली गणिते त्यावेळी खरी ठरली.   त्यावेळेस उदयनराजे ही व्यक्‍ती म्हणजे काय आहे याची जाणिव तत्कालीन नेते मंडळींना झाली. मग कोणी नेता नाही, मला कोणी गॉडफादर नाही, सर्वसामान्य जनतेची ताकदच माझी शक्‍ती आणि संपत्‍ती आहे. जनताच माझी गॉडफादर आहे, अशा धारणेतील त्यावेळचा एकांडा शिलेदार असलेल्या उदयनराजेंच्या नावाचा व कार्यशैलीचा धसका आणि दरारा या निवडणुकीनंतर उभ्या महाराष्ट्रभर पसरला.

स्व.गोपीनाथ मुंडे  व  शरद पवारांचे पुत्रवत प्रेम

भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडेसाहेब, राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा आदरणीय शरद पवारसाहेब यांनी मात्र त्यांना मनापासून आपलं मानले. आदरणीय शरद पवारसाहेब, साधारपणे कुणासही डेमी ऑफिशीयल पत्र लिहिताना डिअर अमुक—अमुक असे संबोधतात. उदयनराजेंना डिओ लेटर लिहिताना, आदरणीय पवारसाहेब हे नेहमीच स्वहस्ताक्षरात माय डियर असा शब्दप्रयोग करतात हे फक्‍त अगदी मोजक्या व्यक्‍तींना माहिती आहे. यावरुनच शरद पवारसाहेबांनी उदयनराजेंना मनापासून आपलं मानलेलं आहे, असे दिसून येते. तथापि राजकारणात सर्वप्रथम स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांमुळेच, खा.श्री.छ.उदयनराजे भोसले हे तत्कालीन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर सातारा विधान सभेची पोटनिवणूक लागली. त्यावेळी स्व.प्रमोद महाजनसाहेबांनी गांधी मैदान सातारा येथे झालेल्या सभेमध्ये तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हांला मंत्री देतो, असा शब्द उपस्थित जनसमुदायाला दिला. त्या निवडणुकीत खा.श्री. छ. उदयनराजे भोसले आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत गेले.

अग्‍नीदिव्यातून सुटका 

महसूल राज्यमंत्री पदावर असतानाच, लागलेल्या पंचवार्षिक विधानसभेच्या निवडणुकीच्या दिवशीच एका षडयंत्रात त्यांना गोवण्यात आले. तथापि कोणतंही अग्‍नीदिव्य पार करुन जाण्याची धमक आणि ताकद असलेले उदयनराजे कालांतराने यातून सहीसलामत बाहेर निघाले. त्यानंतर त्यांनी जी गरुड भरारी घेतली ती आजतागयत कायम ठेवली आहे.

वाचा : उदयनराजे म्हणजेच सातारा...

सन 2009 व सन 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले उच्चांकी व चढत्या मताने सातारा लोकसभा मतदार संघातून निवडून आले. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणण्यात महाराजसाहेब कधीच कमी पडत नाहीत. माय भगिनींना, उदयनराजे म्हणजे आपला रक्षणकर्ता भाऊ वाटतो, इतका बंधूभाव उदयनराजेंच्या कृतीमधून दिसून आला आहे. त्यामुळेच उदयनराजेंचं सातार्‍यातील अस्तित्व अनेकांना आधार देणारे ठरत आले आहे.