Mon, Jun 01, 2020 05:33होमपेज › Satara › शिवेंद्रराजेंची प्रकृती ठणठणीत; उदयनराजेंचे ट्विट

शिवेंद्रराजेंची प्रकृती ठणठणीत; उदयनराजेंचे ट्विट

Last Updated: Feb 20 2020 12:53PM
सातारा : पुढारी ऑनलाईन

मंगळवारची रात्र सातारकरांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने प्रतिभा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केल्यानंतर शिवेंद्रराजेंच्या प्रकृतीचा धोका टळला. संभाव्य धोका नको म्हणून अधिक चाचण्या करण्यासाठी ते स्वत: बुधवारी सकाळी मुंबईला गेले. सातारकरांनी ‘गेट वेल सून’च्या प्रार्थना सुरू केल्या आहेत. दरम्यान,  छत्रपती उदयनराजे भाेसले यांनी स्वतः ट्विट करत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती दिली आहे. 

शिवेंद्रराजे अ‍ॅडमिट झाले अन् सातारा थबकला

काय आहे उदयनराजेंचे ट्विट

आमचे बंधू आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत आहे. कार्यकर्ते व समर्थक यांनी काळजी करण्याचे कारण नाही. असे सांगत हॉस्पिटलमधून लवकरच डिस्चार्ज घेऊन ते आपल्या सर्वांच्या समोर येऊन संवाद साधतील. अशी ग्वाही देखील उदयनराजेंनी ट्विटमधून दिली आहे. #GetWellSoon असा टॅगही उदयनराजेंनी पोस्टमध्ये दिला आहे. 

आ. शिवेंद्रराजे भोसले दररोज सायंकाळी वॉकिंगला जातात. मंगळवारीही ते वॉकिंगला जाण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी त्यांच्या छातीत दुखू लागले. जवळच्या मित्रांना त्यांनी तातडीने बोलावले. अ‍ॅसिडीटीपेक्षा वेगळा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने प्रतिभा हॉस्पिटल येथे नेले. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी तातडीने यंत्रणा हलवली. प्रतिभा हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांनी कमी वेळेत अत्याधुनिक उपचार प्रणाली राबवित शिवेंद्रराजेंचा पल्सरेट नॉर्मलवर आणला. 

देवेंद्र फडणवीस यांच्या जामीनाबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

शिवेंद्रराजेंची प्रकृती स्थिर करण्यासाठी डॉ. साबळे व टीमने प्रयत्नांची शिकस्ती केली. योग्यवेळेत त्वरित उपचार झाल्याने शिवेंद्रराजेंच्या प्रकृतीने उपचारांना प्रतिसाद दिला. मात्र, दरम्यानच्या काळात शिवेंद्रराजे अ‍ॅडमिट झाल्याच्या वार्तेने आख्खा सातारा रात्रीच्यावेळेस जागच्या जागीच थबकला. कार्यकर्त्यांसह शिवेंद्रराजेंंच्या चाहत्यांनी प्रतिभा हॉस्पिटलकडे धाव घेतली. आत शिवेंद्रराजेंवर उपचार सुरु होते तेव्हा प्रतिभा हॉस्पिटलबाहेर  तोबा गर्दी ‘आपला राजा या संकटातून बाहेर पडू दे’, अशी प्रार्थना करीत होती. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवघराण्यातील राजावर आलेले हे संकट टळू दे, अशी आर्जव करताना कार्यकर्ते दिसत होते.

पंरतु आज उदयनराजे यांनी ट्विट करत सर्व कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना दिलासा दिला आहे.