Mon, Sep 21, 2020 17:00होमपेज › Satara › केंब्रिजच्या दोघा कर्मचार्‍यांवर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा

केंब्रिजच्या दोघा कर्मचार्‍यांवर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा

Last Updated: Feb 15 2020 12:55AM
पाचगणी : पुढारी वृत्तसेवा
भिलार (ता. महाबळेश्वर) येथील  केंब्रिज हायस्कूलमधून विद्यार्थी पलायन प्रकरणाला कलाटणी मिळाली असून विद्यार्थ्यांना अश्लील चित्रफीत दाखवणे व वेळोवेळी मारहाण केल्याप्रकरणी केंब्रिज हायस्कूलच्या दोन कर्मचार्‍यांच्या विरोधात पाचगणी पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी एका पालकाच्या फिर्यादीनुसार सूरज भिलारे (रा. सोमर्डी, ता. जावली) व  स्वप्निल कदम (रा. कळमगाव, ता. महाबळेश्वर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी 11 पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर हा गुन्हा पाचगणी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

भिलार येथील केंब्रिजचे 13 विद्यार्थी शाळा व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून पळून निघाले होते. भोसेच्या डोंगरामध्ये ते जाताना काही जागरूक नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर अंगावर शहारे आणणार्‍या गोष्टी त्यांनी सांगितल्या. शाळेतील शिक्षक भिंतीवर डोके आपटतात, बांबूने मारतात, वेळेवर जेवण देत नाही असा तक्रारींचा पाढाच वाचला.

याप्रकरणी विद्यार्थ्यांचे जाब जबाब नोंदवून सपोनि विकास बडवे यांनी जिल्हा बालसंरक्षण अधिकार्‍यांकडे ही मुले सोपवली. यानंतर जिल्हा बालसंरक्षण अधिकार्‍यांनी  चैाकशी करुन पीडित विद्यार्थ्यांकडे झालेल्या प्रकाराची चौकशी केली. दरम्यानच्या काळात सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी सातार्‍यात धाव घेतली. यानंतर एका पालकाच्या तक्रारीनुसार सूरज भिलारे व स्वप्निल कदम यांच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखरू केला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारीअजित टिके करत आहे.

या प्रकारानंतर महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली असून  अतिरीक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी  केंब्रिज हायस्कूलला भेट देवून पाहणी केली. त्यांच्या सूचनानुसार टिके यांनी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत.

 "