सातारा : शिवसागर जलाशयातून बोटीतून मतपेट्यांची वाहतूक

Last Updated: Oct 20 2019 8:13PM
Responsive image

Responsive image

बामणोली : प्रतिनिधी

सातारा लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या दि.२१ रोजी मतदान होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम मतदान केंद्रांवर मतपेट्या आणि कर्मचारी यांना पाठविण्यासाठी बोटीचा वापर केला आहे. 

महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कांदाटी खोऱ्यातील सोळा गांवात मतपेट्या आणि कर्मचारी यांना पाठविण्यासाठी बोटीचा वापर करण्यात आला आहे. तेथील डोंगर मुऱ्यावरील अतिशय दुर्गम भागात चकदेव, पर्वत येथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणुन, महाबळेश्वर मार्गे तापोळा येथुन बार्ज बोटीतून (तराफा) मतपेट्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या गाडया पलीकडे पाठवल्या आहेत. यानंतर येथून पुढे दरे  तर्फ तांब मार्गे कांदाटी खोऱ्यातील सोळा गावांमध्ये पेट्यांची वाहतूक करण्यात आली. 

तसेच जावली तालुक्यातील अतिदुर्गम रवंदी, खिरखंडी, कारगांव या तीन केंद्रावर सातारा मार्गे बामणोली या येथील मतपेट्या व कर्मचारी यांना घेऊन तीन बोटी मार्गस्थ झाल्या. प्रत्येक केंद्रावर जाण्यासाठी कर्मचाऱ्यांसोबत एक पोलिस कर्मचारी देखील देण्यात आले आहेत. कांदाटी खोऱ्यात दरे तर्फ तांब गावाच्या पुढे रस्ता कच्चा असल्याने तिथून पुढे जाणाऱ्या वाहनांना सततच्या पावसामुळे चिखलातून जाताना मोठी कसरत करावी लागते. तर पावसाने रिपरिप चालूच ठेवल्याने मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

'त्यांनी' तुझा आणि माझाही विश्वासघात केला; शीतल आमटेंच्या पतीची भावूक पोस्ट 


आंदोलकांचा दिल्ली पोलिसांना कोंडीत पकडत 'लाठीहल्ला' (Video)


पोलिसांच्या गोळीने नाही, तर ट्रॅक्टर पलटी झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; सीसीटीव्हीतून झाले स्पष्ट


उसाच्या फडाची आग विझवताना एकाचा मृत्यू


निपाणीत प्रजासत्ताकदिनी ११२ क्रमांकाच्या वाहनाचे लॉन्चिंग!


मोठी बातमी! शुक्रवारपासून पश्चिम रेल्वेवर सर्व लोकल सुरू होणार


दिल्ली-लखनौतील सोने तस्करी प्रकरणातील ८ पैकी ४ जण सांगली जिल्ह्यातील


शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनात ८३ पोलिस जखमी; अतिरिक्त डीसीपींच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न


कोल्हापूर : ९ तास २८ मिनीटांत ७२ किलोमीटर धावली 'आसमा', प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजासह पूर्ण केला अनोखा विक्रम


शेतकऱ्यांच्या हिंसाचाराच्या पाठिमागे खलिस्तानी संघटना; काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टूं यांचा आरोप