सातारा : मांढरदेव घाटात दरड कोसळली

Last Updated: Aug 13 2020 3:38PM
Responsive image


सातारा : पुढारी वृत्तसेवा

मांढरदेव घाटात मुख्य रस्त्यावर गुरुवारी (दि.१३) आठ वाजता दरडी कोसळल्याने दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. बांधकाम विभागाच्या श्रीपाद जाधव व त्यांच्या टीमने तीन तासाच्या अथक प्रयत्नातून रस्ता मोकळा करीत वाहतूक सुरळीत केली.

अधिक वाचा : पर्यटकांविनाच वाहतोय ठोसेघर धबधबा (video)

मुसळधार पावसामुळे मांढरदेव घाटात गुरुवारी सकाळी भली मोठी दरड कोसळली. या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. मुसळधार पावसात सुद्धा जेसीबी मशिनच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांना ढासळलेली दरड हटविण्यास यश आले. त्यामुळे वाहतुकीचा निर्माण झालेला प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. दरडी कोसळण्याची भीती व पडणारा प्रचंड पाऊस यामुळे दरड हटविण्यात अडचणी येत होत्या. तरीही मोठ्या प्रयत्नांनी कोसळलेली दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. सध्या पडत असलेल्या प्रचंड पावसामुळे मांढरदेव घाटात दरडी कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने वाहन चालकांनी शक्यतो या घाटातून प्रवास टाळावा असे, आवाहन बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

अधिक वाचा : देखावे, विसर्जन मिरवणुकांना बंदी