Tue, May 26, 2020 15:54होमपेज › Satara › सातारा : कऱ्हाडमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यू

सातारा : कऱ्हाडमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यू

Last Updated: Apr 01 2020 7:00PM
कऱ्हाड : पुढारी वृत्तसेवा

शहरात तीन व चार एप्रिल रोजी जनता कर्फ्यू होणार आहे. त्या दोन दिवसांच्या कालवधीत जीवनावश्यक सेवाही बंद राहणार आहे. अशी माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली. त्यामुळे नागरीकांनी त्यांची सोय करावी, असेही आवाहन मुख्याधिकारी डांगे यांनी केले आहे.

सातारा : '१०० खासगी रूग्णालये सुरू, गर्दी करू नका' (video)

तीन व चार एप्रिल रोजी होणाऱ्या जनता कर्फ्यूच्या काळात शहरातील जीवनाश्यक सेवेसह सर्वच व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. शहरात सध्याची स्थिती लक्षात घेवून पालिकेने हा निर्णय घेतल्याचे डांगे यांनी सांगितले. तसेच शहरात नागरीकांना भाजीपाला, किराणा माल घरपोच दिला आहे. शहरातील नव्वद टक्के लोक संचारबंदीच्या नियमांचे पालन करून घरात बसली आहे. मात्र काही लोक विनाकारण फिरत आहेत. त्यांच्या अशा वागण्याने भविष्यात धोका होवू शकतो. ती स्थिती लक्षात घेवून कोरोनाला रोखण्यासाठी शहरात तीन व चार एप्रिलला जनता कर्फ्यू घेण्यात येत असल्याचे डांगे यांनी म्हटले आहे. 

सातारा : कोल्हापूर नाक्यावर वाहनांच्या रांगा, २२ वाहने जप्त (video)

पुणे, मुंबईसह परदेशातून आलेले नागरिक होम क्वारंटाईन केले आहेत. जिल्हा बंदी असल्याने अन्य जिल्ह्यातून येणारा ओघ कमी झाला असली तरी अद्यापही काही नागरीक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. त्या सगळ्यांवर निर्बंध लागावा यासाठी कर्फ्यूचे आयोजन केले आहे.