Fri, Jul 10, 2020 18:44होमपेज › Satara › शिक्षकाने शाळेतच पेटवून घेतले

शिक्षकाने शाळेतच पेटवून घेतले

Last Updated: Nov 17 2019 1:24AM
सातारा : प्रतिनिधी

परखंदी, ता. वाई येथे पोपट पांडुरंग जाधव (मूळ रा. दिवडी, ता.माण सध्या रा. वाई) यांनी शनिवारी सकाळी शाळेतच पेटवून घेतले. धक्कादायक बाब म्हणजे ते शिक्षक असून या घटनेने खळबळ उडाली आहेे. या घटनेत पोपट जाधव हे गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्यावर सिव्हिलमध्ये पुढील उपचार सुरू आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोपट जाधव यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. इतर शिक्षक, कर्मचार्‍यांची पळापळ झाली. पोपट जाधव हे भाजल्याने त्यांना सहकार्‍यांनी तत्काळ रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी पाठवले. सिव्हीलमध्ये त्यांना आणल्यानंतर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले. या घटनेत ते सुमारे 90 टक्के भाजल्याने ते बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. उपचारासाठी त्यांना दाखल केल्यानंतर त्यांनी नेमके असे का केले? घटनास्थळी नेमके काय घडले? याबाबतही कोणी बोलण्यास तयार नाही. यामुळे या घटनेचे गूढ बनले आहे.