Thu, Sep 24, 2020 09:28होमपेज › Satara › कास पुष्प पठार परिसरात वणवे लावण्याचा प्रकार

कास पुष्प पठार परिसरात वणवे लावण्याचा प्रकार

Last Updated: Jan 29 2020 8:14PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारालगत परिसरात वणवे लावण्यात आल्याची घटना समोर आली. हे वणवे जाणून बुजून समाजकंटकांद्वारे लावण्यात येत आहेत. सध्या या परिसरातील गवत वाळू लागले आहे, मात्र या परिसरात फिरणारे समाजकंटक हे गवत पेटवून देत आहेत.

अधिक वाचा : कराडात हुल्लडबाजांची पोलिसांकडून धरपकड

सातारा शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या कास पुष्प पठाराकडे देशभरातून हजारो पर्यटक येत असतात. सातारा शहर बोगदा परिसर ते कास बामणोली या संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बामणोली कार्यालयाच्या वतीने जनजागृती करण्या करिता वणवा, वन्यप्राणी शिकार यावर प्रबोधनपर फलक रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले आहेत. मात्र गणपती खिंड ते आनावळे जांभुळमुरे या दरम्यान असणारे पठार पूर्णपणे काळेकुट्ट झाले आहे. 

अधिक वाचा : भीमा-कोरेगाव तपासासंबंधी केंद्र सरकार संभ्रमात : प्रकाश आंबेडकरांचा आरोप

समाजकंटकांकडून लावलेल्या या आगीमध्ये आनावळे गावाच्या अलीकडे असणारे पठार पूर्णपणे होरपळून गेले आहे. तर छोटी मोठी झाडे देखील या वणव्यात जळून खाक झाली आहेत. कास पुष्प पठारापासून अगदी वीस ते पंचवीस मिनिटांच्या अंतरावर असणारे हे पठार दिवसा ढवळ्या जळून खाक झाले आहे. यामुळे वणवा लावू नका याबाबत वनविभागाचे सुरू असणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे निदर्शनास येत आहेत.

अधिक वाचा : भारत बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण

 "