Tue, Jun 02, 2020 20:10होमपेज › Satara › #Valentinesday : फ्लेमिंगो - प्रेमाचा निखळ आविष्कार

#Valentinesday : फ्लेमिंगो - प्रेमाचा निखळ आविष्कार

Last Updated: Feb 14 2020 10:24AM

सुर्याचीवाडी तलावातील फ्लेमिंगो पक्षी‘व्हॅलेंटाईन डे’ विशेष

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथे फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले आहे. या पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले सूर्याचीवाडी तलावाकडे वळू लागली आहेत. उंच मान, वैविध्यपूर्ण गुलाबीरंगी छटा असलेले फ्लेमिंगो आकाशातून विहार करताना जणू ते फायर विंग्ज भासत आहेत. हे पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमींनी गर्दी केली असून सूर्याचीवाडी करांनी या पक्षांची गगनभरारी अनुभवली. प्रेमाचा निखळ आविष्कार हे या पक्षांचे वैशिष्ठ्य.यांचा प्रेमालाप जेव्हा सुरू होतो तेव्हा ह्रदयाच्या आकार नर-मादीच्या उंचच उंच मानेतून दिसून येतो. जन्मभर हे पक्षी एकमेकांची साथ सोडत नाहीत. जणू मेड फॉर ईच आदर असेच त्यांचे आयुष्य असते. 

वाचा : ‘केंब्रिज’प्रकरणी संतप्‍त पालक पोलिस ठाण्यात

सध्या मायणीपासून काही अंतरावर असलेल्या या सूर्याचीवाडी तलावावर १२ फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले आहे. फ्लेमिंगो आणि खटाव तालुक्यातील तलावांचे नाते अतुटच आहे. का कोणास ठावूक? पण फ्लेमिंगो या तलावांच्या प्रेमात पडलेले आपल्याला पाहायला मिळतात.

वाचा : पक्ष्यांमध्येही होतो प्रेमाचा केमिकल लोचा!

पक्ष्यांनाही भाव-भावना असतात. त्यांची परस्परांशी संवाद साधण्याची भाषा असते. मात्र ही भाषा शब्दांच्या पलीकडची. पक्ष्यांचा निःशब्द संवाद समजून घेण्यासाठी मानवाला प्रशिक्षकाची गरज नसते. त्यांच्या भावनांचा कल्लोळ आपणास सहज ओळखता येतो.

पक्ष्यांनी त्यांच्या संवाद आणि संपर्कासाठी स्वतःची अशी भाषा (डायलेक्टस्) विकसित केली आहे. यास ‘लँग्वेज अँड कम्युनिकेशन’ म्हटले जाते. मादीला आकर्षित करण्यासाठी नर किंवा नराला आकर्षित करण्यासाठी मादी विशिष्ट देहबोलीचा वापर करते. भिन्‍न अंगविक्षेप त्या त्या नर-मादीसाठी आमंत्रण असल्याचे ते समजतात. दुसरा सर्वात मोठा संकेत म्हणजे ध्वनी किंवा विविध प्रकारचे आवाज. या ध्वनी संकेतांनी पक्षी ‘संपर्कात राहा’, ‘माझ्याजवळ ये’, ‘हा माझा प्रदेश आहे’, ‘जरा जपून, पुढे धोका आहे’... असे संवाद साधतात. कबुतर, मैना, पोपट, मोर आणि कावळा आदी पक्षी ध्वनी संकेताने परस्परांशी संपर्क साधतात.