Tue, Aug 11, 2020 21:27होमपेज › Satara › पोकलेनच्या धक्क्याने निढळचा वृद्ध जागीच ठार

पोकलेनच्या धक्क्याने निढळचा वृद्ध जागीच ठार

Published On: Dec 02 2017 12:36AM | Last Updated: Dec 01 2017 10:07PM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी

निढळ गावच्या हद्दीत सातारा-पंढरपूर रस्त्यावर पोकलेनचे माती ओढण्याचे खोरे लागल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मयत झालेल्या व्यक्‍तीचे नाव बबन विष्णू दळवी (वय 68, रा. निढळ) असे आहे.

याप्रकरणी पोकलेन चालक राजू श्रीरामचंद्र साव (रा. अरखांगो, झारखंड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रकांत दादू मर्ढेकर (व्यवसाय रिक्षाचालक, रा. सह्याद्री नगर, ईसबावी, पंढरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातारा-पंढरपूर रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. सकाळी 11 च्या सुमारास निढळ  गावच्या हद्दीत रोडवरील पुलाजवळ पंढरपूर बाजूकडून येणार्‍या व्हॉल्वो कंपनीच्या पोकलेनवरील चालक राजू श्रीरामचंद्र साव याने पुसेगाव (सातारा) बाजूकडून येणार्‍या टी.व्ही.एस एक्स.एल मोटारसायकलीस डाव्या बाजूला पोकलेनचे माती ओढण्याचे खोरे धडकवल्याने दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. त्यातील आबा दामू इंजे (वय 67, रा. निढळ) हे गंभीर जखमी झाले, तर मागे बसलेले बबन विष्णू दळवी हे जागीच ठार झाले.

दरम्यान, जखमी आबा इंजे यांना 08 रुग्णवाहिकेने सातारा येथील रुग्णालयात तातडीने नेण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.