सातारा : वादग्रस्त दगडी खाण अखेर झाली सील

Last Updated: Jan 21 2021 2:29AM
Responsive image


कुडाळ (सातारा) : पुढारी वृत्तसेवा

जावळी तालुक्यातील वादग्रस्त ठरली केंजळ दगडी खाण आज (दि.२०) तहसीलदार मनीषा आव्हाळे यांनी सील केली. रोड वे सोल्युशन ऑफ इंडिया कंपनीचे क्रशर सील केल्याने जावळी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जावळीच्या डोंगरामध्ये दगड खाणीचे विनापरवाना उत्खनन करत होते. (Tehsildar Manisha Awhale action in Jawali tehsil sealed stone crusher )

अधिक वाचा : कतारने घेतलेल्या धाडसी भुमिकेमुळे इराणला 'अच्छे दिन' येणार?

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर तहसीलदार मनिषा आव्हाळे यांनी माहिती घेऊन मोठी कारवाई केली. तहसीलदार आव्हाळे थेट घटनास्थळी जाऊन कारवाईचा बडगा उगारला. बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या कंपनीवर थेट गुन्हा दाखल करण्यात आला.