Sat, Jul 11, 2020 19:30होमपेज › Satara › कराड : महामार्गावर टोल माफ करण्याची अवजड वाहन चालकांची मागणी

कराड : महामार्गावर टोल माफ करण्याची अवजड वाहन चालकांची मागणी

Published On: Aug 09 2019 11:07AM | Last Updated: Aug 09 2019 11:07AM

कराड-कोल्हापूर महामार्गावर पुरामुळे अडकलेली वाहनेतासवडे टोलनाका (कराड) : वार्ताहर 

कोल्हापूर जवळ महामार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे सलग तीन दिवसापासून महामार्गावर अडकलेल्या हजारो  वाहनधारकांकडून टोल माफ करण्याची मागणी करण्यात येत आहे.
 कोल्हापूर, सागंली आणि सातारा या जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यात महापुराचे भीषण संकट निर्माण झाले . या महापुराचा जबरदस्त दणका पुणे बेंगलोर राष्ट्रीय  महामार्गसही बसला आहे. या पुरामुळे कोल्हापूर जवळ शिरोली याठिकाणी महामार्गवर  पंचगगा नदीचे  पुराचे पाणी तब्बल आठ फुट आले आहे. तसेच सातारा जिल्ह्यात वाठार परिसरात महामार्गावर पाणी आले होते. त्यामुळे सातारा, कोल्हापूर येथील प्रशासनाकडुन महामार्गवरील वाहतूक थांबावण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान मागील तीन दिवसांपासून महामार्ग ठप्प झाला असून हाजारो ट्रक यासह अवजड वाहने महामार्गवर अडकुन पडली आहेत. या वाहनधारकांमध्ये तामिळनाडू , केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश , गुजरात यासह राज्यातील ट्रक चालकांचा समावेश आहे. 

अन्न नाही पाणी नाही जवळचे पैसेही सपंले अशी भयानक परस्थिती निर्माण झाली आहे. महामार्गाच्या बाजुने असणाऱ्या गावांनाही पुराचा फटका बसला आहे. मात्र तरीही या ग्रामंस्थानी  घरातील भाकरी, तादुंळ  पाणी जमा करून वाहनचालकांसाठी गेल्या तीन दिवसापासुन सकाळी आणि सध्यांकाळी जेवणाची सोय केली आह. एवढे मोठे अस्मानी सकंट कोसळले आहे. तरी महामार्गवरील वाहनचालकांसाठी प्रशासनाकडुन कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. उलट महामार्गच्या लगतच्या गावांनी , स्वंयसेवा संस्था यांनी  माणुसकी जिवंत ठेवत निस्वार्थीपणे वाहनचालकां सर्व  प्रकारची मदत गेली तीन दिवसापासून करत आहेत. त्यामुळे या भयानक संकटात अडकलेल्या  वाहनचालकांकडुन  निदान शासनाने महामार्गवरील टोल मधुन माफी दयावी अशी जोरदार मागणी होत आहे.