काही लोकांना आमचं सरकार आल्याने अडचणी आल्या : जयंत पाटील

Last Updated: Nov 29 2020 1:11AM

जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीससातारा : पुढारी वृत्तसेवा

साताऱ्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करत, काही लोकांना आमचं सरकार आल्याने अडचणी आल्या, असे म्हटले आहे. ते साताऱ्यात बोलत होते. 

सातारा : मेढ्याच्या नगरसेविकेची पुण्यात आत्महत्या

विरोधकांनी सरकारवर टीका केल्या. मात्र कोरोना काळात डगमगून न जाता सरकारने योग्य निर्णय घेतले. हे सरकार स्थिर असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार हे फडणवीस यांच्या मनात कसं येतं? असा प्रश्न करत जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच आमचं सरकार येणार अशी हाकाटी उठवण्याचा प्रयत्न काही लोकांचा सुरु असून आमचं सरकार आल्याने त्यांना अडचणी आल्या असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. 

आमदार शिवेंद्रसिंहराजेंची वाई न्यायालयात हजेरी

तसेच यावेळी पाटील यांनी, पक्ष प्रवेशाबद्दल बोलताना निवडणूक झाल्यानंतर काही गोष्टी समोर येतील आणि निर्णय घेऊन लिस्ट जाहीर करणार असल्याचा गौप्यस्फोट केला.