Fri, Sep 18, 2020 14:15होमपेज › Satara › सातारा : लोणंद डोंगर परिसरात लपेटली धुक्याच्या दुलई

सातारा : लोणंद डोंगर परिसरात लपेटली धुक्याच्या दुलई

Last Updated: Aug 05 2020 12:07PM

लोणंद येथील श्री. भैरवनाथ डोंगर परिसरात पसरलेले धुके. लोणंद :  शशिकांत जाधव    

लोणंद येथील श्री. भैरवनाथ डोंगर परिसराला आज पहाटे दाट धुक्याच्या दुलईने लपेटून टाकले आहे. रिमझिम पाऊस त्यातच दाट धुके यामुळे लोणंदला महाबळेश्वर अवतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. तसेच पांढरे शुभ्र ढग लोणंदच्या डोंगरावर दिसत होते. या ठिकाणी काहीच नागरिकांना निर्सगाचा सुंदर नजारा पाहण्यास मिळाला.

वाचा : ‘कोयने’ला प्रशासनाचा धोका!

खंडाळा तालुक्यातील लोणंद परिसरात गेल्या दोन दिवसांपासून हलक्या व मध्यम स्वरुपाच्या संततधार पावसाने हजेरी लावलेली आहे. यातच आज पहाटेपासून धुक्याच्या दुलईने लोणंदसह श्री. भैरवनाथ डोंगर परिसर लपेटून गेला. त्यामुळे डोंगरावर जणू काही महाबळेश्वरचे वातावरण अवतरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. निर्सगाचा हा आनंद नागरिकांना मनमुरादपणे लुटता आला.

वाचा : ‘सांगली जिल्ह्यात संततधार, बळीराजा सुखावला

 "