Sat, Jul 04, 2020 04:28होमपेज › Satara › कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचाच भगवा फडकेल

कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचाच भगवा फडकेल

Published On: Sep 26 2019 2:28AM | Last Updated: Sep 25 2019 11:41PM
कोरेगाव : प्रतिनिधी

राज्यातील जनतेला शिवसेना-भाजप युतीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची युती ही निश्चितपणे होणारच आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपामध्ये देखील शिवसेनेकडेच राहणार असून कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा ठाम विश्?वास शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख तथा परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी व्यक्त केला. 

कोरेगाव येथील शिवरत्न मंगल कार्यालयात झालेल्या शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ क्षेत्रप्रमुख भानुदास कोरडे, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे,  किशोर बाचल आदी उपस्थित होते. 

ना. रावते पुढे म्हणाले, मी आतापर्यंत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील तीन निवडणुका पाहिल्या आहेत, मात्र यावेळचा इथला माहोल शिवसेनेचाच भगवा फडकेल, हे सांगत आहे. पण हा भगवा कोणाच्या खांद्यावर देणार हाही प्रश्?न तुम्हाला पडला असेल, पण ज्याच्या खांद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे देतील, त्यावेळी तो आदेश असेल आणि शिवसेनेचाच भगवा फडकेल. 
प्रा. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील दुष्काळ हद्दपार करण्यासाठी जिहे-कठापूर, वसना-वांगणा आदी योजना शिवसेनेने पुढाकार घेऊन मार्गी लावल्या आहेत. 

किशोर बाचल म्हणाले, शिवसेनेबरोबर दीड वर्षे संपर्क होता आणि समन्वय होता. गेल्या महिन्याच्या अखेरीस मी शिवसेनेत जाहीररित्या प्रवेश करुन काम करण्यास सुरुवात केली आहे. 
मेळाव्यास हणमंतराव चवरे, रणजितसिंह भोसले, प्रताप जाधव, दिनेश बर्गे, पं.स. सदस्य मालोजी भोसले, दत्ताजीराव बर्गे, बाळासाहेब फाळके, सचिन झांजुर्णे, दत्तात्रय नलवडे, दिनेश देवकर, उज्ज्वला भोसले, अक्षय बर्गे उपस्थित होते.  

शिवसेनेचे कोरेगावात जोरदार शक्तिप्रदर्शन

कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा असून, 2014 ची सार्वत्रिक निवडणूक वगळता शिवसेनेने पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवली आहे. आता किशोर बाचल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली असून, गावभेटीवर भर दिला आहे. यावेळी प्रथमच शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन करत मेळावा घेतल्याने परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी कौतुक केले.