Tue, Jul 14, 2020 11:14होमपेज › Satara › सातारा : जावळीत शेतकऱ्याने भाताच्या तरव्यातून दिला 'कोरोना जा'चा संदेश (video)

शेतकऱ्याने दिला 'कोरोना जा'चा संदेश (video)

Last Updated: Jun 30 2020 1:29PM
कुडाळ : पुढारी वृतसेवा 

महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. सातारा जिल्ह्यात एक हजारापेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याच  सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये मुख्य पीक असणाऱ्या भात उत्पादक शेतकऱ्याने मात्र कोरोना विषाणूचा लोगो आणि जा कोरोना असे शब्‍द संदेश भाताच्या पिकांमधून देण्याचा प्रयत्‍न केला आहे.

अधिक वाचा : तीन आठवड्यानंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीला ब्रेक!

यशवंत पवार या सनपाने गावच्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतामध्ये कोरोना विषाणूची आकृती बनवून भात खाचरामध्ये भात रोपाची तरवे टाकून कोरोना जा गो कोरोना, कोरोना परत जा, असा संदेश दिला आहे. भात खाचरामध्ये रोप टाकून उगवलेल्या भाताच्या तरव्यामधून हे कलात्‍मक दृष्‍य नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामुळे नागरिकांमध्ये कोरोना विषाणू विषयी जनजागृती होत आहे.   

अधिक वाचा : पाकिस्तानातून मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आला फोन; २६/११ सारख्या हल्ल्याची दिली धमकी

जावळी तालुक्यातील पाचगणीत, कुडाळ रस्त्यालगत सनपाणे गाव आहे. या गावच्या शेतकऱ्याने भात शेतीमध्ये 'कोरोना जा' चा संदेश देण्याचा प्रयोग केला आहे. भात शेतीमध्ये उगवून आलेले 'कोरोना जा' चे तरवे येणाऱ्या- जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सातारा जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे स्वतःचे संरक्षण स्वतः केले पाहिजे, कोरोनाची साखळी तोडली गेली पाहिजे, यासाठी स्वतःच्या शेतामध्येच कोरोना आकृती सारखे भात खाचरामध्ये भाताचे तरवे टाकून त्‍यातून उगवलेल्या भात शेतीतून कोरोना विषयी जनजागृतीचा आगळावेगळा संदेश देण्याचा प्रयत्‍न केला आहे.