Wed, Aug 12, 2020 20:30होमपेज › Satara › श्रीगुरुजी पुरस्काराचे आज वितरण

श्रीगुरुजी पुरस्काराचे आज वितरण

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 10:23PMसातारा : प्रतिनिधी

रा. स्व. संघ, जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्त्तींना पूजनीय श्रीगुरूजी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदा पर्यावरण क्षेत्रासाठी ग्लेसिअर मॅन म्हणून ओळखअसणारे काश्मिर-लडाखचे चेवांग नॉर्फेल यांना आणि लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी काम करणार्‍या श्रीमती ज्योती पठानिया, मोशी, पुणे यांना महिला सबलीकरण क्षेत्रासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. रविवार दि. 11 रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

भारतमातेच्या चरणी संपूर्ण जीवन समर्पित करणार्‍या श्रीगुरूजींचं जीवन म्हणजे एक धगधगतं यज्ञकुंडच. द्वितीय सरसंघचालक म्हणून जबाबदारी आलेल्या श्रीगुरूजींनी आपल्या सेवाकृर्तृत्वाने उत्तुंग कार्य उभे केले. समर्पण, सेवा, संघटन या सर्वांना एक वेगळा आयाम दिला. आज पुरस्कार वितरण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पूजनीय गोळवलकर गुरूजींच्या कार्याचा ज्योति संत यांनी आढावा घेतला. संघकार्याच्या डॉ. हेडगेवार यांनी लावलेल्या रोपाचा श्रीगुरूजींनी वटवृक्ष केला.   डॉ. हेडगेवारांच्या निर्वाणानंतर सरसंघचालकाची धुरा श्रीगुरुजींकडे आली.

त्यावेळी श्रीगुरूजी म्हणाले, सरसंघचालकाचे हे पद म्हणजे विक्रमादित्याचे सिंहासन आहे. त्यावर बसण्याचा मान माझ्यासारख्या सामान्य व्यक्त्तीस मिळाला आहे. पदाचा कार्यभार स्वीकारताच श्रीगुरुजींनी पूर्णकालीन आणि आजीवन समर्पित अशा प्रचारकांची व्यवस्था निर्माण केली. देशभक्त्तीच्या, ईशभक्‍तीच्या आणि राष्ट्रनिर्मितीच्या कोंदणात संघकार्य बसविण्यासाठी देशभरात दौरे केले. भाषणे दिली, बैठका घेतल्या. 1942 च्या आंदोलनात व्यक्त्तीश: भाग घेतला. फाळणीच्या संकटात पंजाब, सिंध, बंगाल प्रांतातून लाखो हिंदूंच्या निर्वासनाचा प्रश्‍न उभा राहिला. या कसोटीच्या काळात स्वयंसेवकांना मार्गदर्शन करुन पंजाब रिलीफ कमिटीच्या माध्यमातून निर्वासित हिंदू बांधवांना मदतीचे प्रचंड कार्य उभे केले.