वीर धरण भरले, नीरा नदीत सोडले पाणी

Last Updated: Aug 13 2020 5:25PM
Responsive image


लोणंद : प्रतिनिधी

वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने वीर धरण 99.27 टक्के भरले आहे. धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याने वीर धरणाच्या तीन गेटमधून नीरा नदीच्या पात्रात 13,950 क्युसेक्स पाणी प्रती सेकंद सोडण्यात येत असल्याची माहिती वीर धरण उपविभाग सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिलीआहे.

दरम्‍यान, भाटघर धरणात 73.72 टक्के, निरा- देवघर धरणात 61.45 टक्के, गुंजवणी धरणात 90.03 टक्के पाणीसाठा झाला आहे. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा वीर धरण उपविभाग सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिला आहे.