Mon, Sep 21, 2020 17:57होमपेज › Satara › मतिमंद महिलेवर बलात्कार; दोघा जणांवर गुन्हा दाखल

मतिमंद महिलेवर बलात्कार; दोघा जणांवर गुन्हा दाखल

Last Updated: Feb 15 2020 12:55AM
वेणेगाव : पुढारी वृत्तसेवा
सातारा तालुक्यातील एका गावामध्ये मतिमंद महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना बोरगाव पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. याप्रकरणी संदीप ऊर्फ संतोष हणमंत निकम (वय 29) याला अटक करण्यात आली आहे. 

पीडित मतिमंद महिलेवर बलात्कार झाल्याने ती गरोदर राहिली होती. यावरून तिच्या नातेवाईकांनी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासात पीडितेच्या अवस्थेचा गैरफायदा घेत वेळोवेळी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले आहे.  या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सपोनि चंद्रकांत माळी व निर्भया टीमच्या माधुरी जाधव यांनी तपासात लीड घेत तपासाची रूपरेखा ठरवली. माहिती कमी असताना सपोनि माळी व जाधव यांच्या पथकाने अवघ्या 24 तासात याप्रकरणी एका संशयितास अटक केली. संशयिताने गुन्हा केल्याची कबुली देवून यामध्ये आणखी एक साथीदाराची माहिती दिली. त्यावरून दुसर्‍या अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले.

या कारवाईत सपोनि चंद्रकांत माळी, माधूरी जाधव, सातारा शहर डीबीचे पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार रेश्मा सोनवले, अर्चना मोटे, सुशीलकुमार मांढरे, उमेश बगाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कुंभार, भीमराव यादव, बाजीराव पायमल, हवालदार बाबा महाडिक, पोना राजू शिखरे, चेतन बगाडे, विशाल जाधव, प्रवीण माने यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.

 "