Sat, May 30, 2020 13:35होमपेज › Satara › साताऱ्यात पोलिसांकडून ४० दुचाकीस्वारांवर कारवाई 

साताऱ्यात पोलिसांकडून ४० दुचाकीस्वारांवर कारवाई 

Last Updated: Apr 01 2020 7:11PM

शहर पोलिसांनी कारवाई करत जप्त केलेल्या दुचाकीसातारा : पुढारी वृत्तसेवा

सातार्‍यात लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणार्‍या दुचाकीस्वारांना अडवून पोलिस कारवाई करत आहेत. बुधवारी सकाळी शहर पोलिसांनी तब्बल ४० दुचाकीस्वारांवर कारवाई करत दुचाकी जप्तीचा धडाका लावला आहे. दरम्यान, नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सातारा : कऱ्हाडमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी व बीट मार्शलद्वारे गस्त सुरु आहे. पोलिस रिक्षासह पोलिस व्हॅनमधून बीट मार्शलद्वारे नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करत आहेत. रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने अखेर पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून रस्त्यावर येणार्‍या दुचाकी जप्त करण्याचा सपाटा सुरु केला. बुधवारी सकाळी कमानी हौद परिसरात शहर पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी पोलिस कर्मचार्‍यांसोबत नाकाबंदी करत ४० दुचाकीस्वारांवर कारवाई केली. 

सातारा : कोल्हापूर नाक्यावर वाहनांच्या रांगा, २२ वाहने जप्त (video)