Thu, Jul 02, 2020 20:33होमपेज › Satara › शिवजयंतीसाठी फलटणनगरी सज्ज

शिवजयंतीसाठी फलटणनगरी सज्ज

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 11:03PMफलटण : प्रतिनिधी

 छत्रपती शिवरायांची सासुरवाडी आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ असलेल्या फलटणमध्ये  शिवजयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा आणि कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शोभायात्रेत दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील विजेता ठरलेल्या चित्ररथाच्या धर्तीवर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्रधर्तीवर बनवलेला 

फलटणच्या या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. 
फलटणनगरी तसेच तालुका शिवजयंतीसाठी सज्ज झाली असून ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामध्ये सोहळ्यात पालखी सोहळ्याचे आणि मर्दानी खेळांचे थरारक प्रात्यक्षिक पाहता येणार आहे. झांजपथक, ढोल पथक, हलगी पथक, गजीनृत्य, ब्रास ब्रँड, पारंपरिक संबुळ वादक यांचे वेगळे आकर्षण राहणार असून हत्ती, उंट, घोडे शोभायात्रेला वेगळी शोभा प्राप्त करुन देणार आहेत. आकर्षक लेझर लाईट, शोभेच्या दारुची नयनरम्य आतषबाजी, छत्री, झुुंबर लाईट आणि गजीनृत्य व लेझिम पथक या शोभायात्रेची शोभा निश्‍चित वाढवणार असून फलटणच्या परंपरेला शोभेल अशाच प्रकारची शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा निघणार आहे. 

म. फुले चौकात खास उभारलेल्या प्रवेशद्वारातून दि. 17 रोजी सायंकाळी शोभायात्रेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात येणार आहे. मिरवणूकीत शिस्त आणि नियोजनाला वेगळे महत्व देण्यात येणार असल्याने कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता अबालवृध्दांना या शोभायात्रेचा लाभ घेता येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे. शिवपुत्र शंभूराजे आणि साक्षात जिजाऊ या नाट्यकृतीचे उद्घाटन सकाळी 8.30 वाजता जि. प. संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नाट्यकृती शोभायात्रा पाहण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags :Phaltanagari ready for Shiv Jayanti